ती

वट पौर्णिमेला ती नव्या नवरी सारखी नटली
सौभाग्याची संस्कृती तीने मनापासून जपली

ओढ तिला नेहमी त्याच्या येण्याची लागलेली
प्रत्येक वेळी पाऊलावर पाऊल ठेऊन चाललेली

चुकले कुठे? हुकले कुठे? तिने कधी न विचारले
निर्णयावर ठाम तुझ्या डोळे झाकुन उत्तर दर्शवले

आज तिने कडकडीत उपवास केला
पुर्ण देह तिने त्याच्यासाठी उपाशी ठेवला

दिर्घ आयुष्य मिळावं म्हणुन तिने व्रत केला
किती सोसले दुःख तिने कधी विचार नाही केला

  • कमलाकर काळे
  • जालना
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नमस्कार सर🙏
    सर्वप्रथम आपले लिंक मराठी दैनिक बातमीपत्र आणि साहित्य प्रणालीत आपले सस्नेह स्वागत !!💐

    आपली कविता साध्या सोप्या भाषेतून खूप काही सांगून गेली.
    स्त्रियांसाठी हा सण एक उत्सवप्रमाने असतो.
    नवीन साडी नेसून नटून थटून प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी उपवास पकडून हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून वडाची पूजा करून त्याला साकडे घालत असते. मग तो कसाही असो.

    संसार करीत असताना आलेल्या सुख, दुःखांना तोंड देत “ती” नेहमी त्याच्यासोबत आयुष्यभर ठामपणे उभी ठाकलेली असते. कितीही संकटे आली तरी “ती” आपल्या जीवनसाथीला कायम साथ देत असते.

    शब्दांची सांगड घालून आपण रचलेली कविता खरंच मनाला खूपच भावली.
    धन्यवाद…!!💐

- Advertisment -spot_img

Most Popular