अहिल्यामातेला कोटी कोटी प्रणाम
त्यांच्या कार्याला माझा सलाम.
आली संकटे खुप मातेवर
डोळ्यांनी पाहिले आप्तांचे कलेवर
ना कधी डगमगल्या संकटाला
चांगलाच धड़ा शिकवला शत्रुला.
लोककल्याणकारी राज्य केले
आदर्श राज्याचे धड़े आम्हा दिले.
न्यायाने राज्य उभारिले
अन्यायाला दंडित केले.
जीव त्यांचा प्राणीमात्रार
माता भारी भरली जगावर.
मातेची साधी राहणी, उच्च विचारसरणी
अनुकरण करेल का ? राजकारणी.
आदर्श राज्य लोककल्याणकारी
कार्य त्यांचे कश्मीर ते कन्याकुमारी.
मातेच्या कार्याने प्रभावित जनता
गौरविले तुज राजमाता,राष्ट्रमाता.
अहिल्यामातेचे राज्य सुंदर स्वर्गाहुनी
गौरविले त्यांना पुण्यश्लोक देवी म्हणूनी.
मातेच्या कार्याला नाही विसरणार
कार्य कर्तुत्वाचा प्रचार प्रसार करणार.
कवि - किसन आटोळे
वाहिरा ता.आष्टी
मुख्यसंपादक