Homeमुक्त- व्यासपीठप्रेम की लफडं…!

प्रेम की लफडं…!

कॉलेजच्या पहिल्या दिवशी
त्यानं तिला लेक्चरमध्ये बघितलं
चाफेकळी नाक,गुलाबी ओठ बघून
भान त्याचं हरपलं

तिच्यासाठी तो प्रत्येक लेक्चर्स
अटेंड करु लागला
कधी कॅन्टीन तर बस स्टॉप
असा तिच्यामागे तो फिरु लागला

एकतर्फी प्रेमाची चाहूल
नजरेनं त्याच्या तिलाही लागली
मित्र-मैत्रिणी नावानं त्याच्या
आता,तिलाही चिडवू लागली

ते माझं पाखरु चाललंय
असं तो भररस्त्यात मित्रांमध्ये ओरडला
तिला राग आला,पण त्या कोवळ्या वयात
हळूहळू तिचाही जीव त्याच्यात गुंतला

एके दिवशी गुलाब देवून
त्यानं तिला प्रपोज केलं
हृदयात लपलेलं अल्लड प्रेम
आता तिच्याही ओठी आलं

मिठीत घेऊन त्यानं तिला
स्वर्ग सुखाची स्वप्नं दाखविली
मोहात पडून भुलथापांना,
शरीर सुखाची मागणी याची
तिनं आता मान्य केली

वर्षाआड वर्ष सरले
लग्नाचं आमिष दाखवून
तिचा उपभोग घेत राहिला
टवाळखोर मित्रांमध्ये,
तिच्या नग्न स्त्री देहाचं
तो वर्णन करु लागला

ऐन तारुण्यात आकर्षणाने झालेली चूक
आता तिच्याही लक्षात आली
मी केलं खरं प्रेम अन् त्यानं फक्त लफडं
ही जाणीव आज तिलाही झाली…!

  • संदीप देवीदास पगारे,
    खानगाव थडी,नांदूर मधमेश्वर-नाशिक

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular