स्वच्छंदी फुलपाखरू व्हावे
रंगीबिरंगी फुलात जावे
फुलाफुलांवर मारत उड्या
मकरंद चोखत बसावे….
गुलाब जाई जुई चमेली
शेवंती झेंडू चाफा मोगरा
सुंगध दरवळे चोहिकडे
सोबतीला मंद मंद वारा…..
विविध रंगी विविध ढंगी
विश्व फुलांचे असे न्यारे
विसरून जातो मलाच मी
इतके मजला ते प्यारे…….
एकटाच कसा जाऊ तिथं
माझी सखी असे सोबतीला
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात
बहर आला माझ्या प्रेमाला…..
– कवी किसन आटोळे सर
मुख्यसंपादक