Homeवैशिष्ट्येभाग १६- अंदाजपत्रकाचे प्रमुख ४ प्रकार कोणते व सविस्तर माहिती-:

भाग १६- अंदाजपत्रकाचे प्रमुख ४ प्रकार कोणते व सविस्तर माहिती-:

भाग १६
अंदाजपत्रकाचे प्रकार

१६. अंदाजपत्रकाचे प्रमुख ४ प्रकार आहेत.


अ. अंदाजपत्रक कालावधिष्टीत असू शकतात.
ब. अंदाजपत्रके स्वभावाधिष्टीत असू शकतात.
क. अंदाजपत्रके कृतीनुसार असू शकतात.
ड. अंदाजपत्रके कार्यानुसार असू शकतात.
अ. कालावधिष्टीत अंदाजपत्रके (Time Based)
🔹दीर्घ मुदतीचे (५ ते १० वर्षे) अंदाजपत्रक
🔹अल्प मुदतीचे (१ ते २ वर्षे) अंदाजपत्रक
🔹वार्षिक अंदाजपत्रक
🔹अंतरिम अंदाजपत्रक
ब. स्वभावाधिष्टीत अंदाजपत्रके (Nature Based)
🔹कृतिशील अंदाजपत्रक
🔹आर्थिक अंदाजपत्रक
🔹अवित्तीय अंदाजपत्रक
क. कृतीआधारित अंदाजपत्रक (Activity Based)
🔹निश्चित अंदाजपत्रक
🔹लवचित अंदाजपत्रक
ड. कार्याधारित अंदाजपत्रक (Function Based)
🔹प्रमुख अंदाजपत्रक
🔹विक्री अंदाजपत्रक
🔹उत्पादन अंदाजपत्रक

अंदाजपत्रक करण्याचे फायदे?

१७. अंदाजपत्रक करण्याचे फायदे ?
▶️ अंदाजपत्रक नियोजनावर आधारित असल्यामुळे भविष्यांत डोकावणे शक्य आहे.
▶️ अंदाजपत्रकामुळे संस्थेच्या उद्दिष्टांची जाणीव होते व नवी दृष्टी मिळते.
▶️ साधनाच्या वापरात अधिक सुसूत्रता येते व सुधारणा होते.
मुल्याधार व मुल्य-परिणामकारकता वाढते.
▶️ सुसंवाद व सहयोग वाढतो.
▶️ जबाबदारीचे विकेंद्रीकरण होतेच पण त्याचबरोबर नियंत्रणातील परिणामकारकताहि वाढते.
▶️ कार्यवाही, अंमलबजावणी व आवश्यक ती उपाययोजना अधिक परिणामकारक होऊ शकते.
▶️ योग्य माहितीची उपलब्धता वाढते व मूल्यमापन कसे केले जाणार आहे याचीही पूर्ण माहिती असते.
▶️ कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक ठरते.

अंदाजपत्रक पद्धतीतील त्रुटी :
१८. अंदाजपत्रकामुळे काही त्रुटीही निर्माण होऊ शकतात.

▶️ अंदाजपत्रक अंदाजपंचे हि असू शकते व त्यामुळे विश्वासर्हता कमी होऊ शकते.
▶️ प्रत्येकाची संकल्पना वेगळी असल्याने अंदाजपत्रकीय तरतूद फारच जास्त किंवा अगदीच कमी होऊ शकते.
▶️ अंदाजपत्रकाकडे आकड्याची करामत किंवा कागदी वाघ म्हणून बघण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.
▶️ अंदाजपत्रकामुळे गुणात्मक दर्जा ऐवजी संख्यात्मक बाबींकडे जास्त लक्ष दिले जाऊ शकते.
▶️ अंदाजपत्रकानुसार सर्वच साधनांचा उपयोग झालाच पाहिजे असे वाटल्यास मुख्य परिणामकारक ते ऐवजी साधनांचा वापर होण्याची शक्यता असते.
▶️ काही व्यक्तींना अंदाजपत्रकासोबत येणारे प्रशासकीय काम व कागदी घोडे सहन होत नाही. ( खर तर रागच येतो)
▶️ अंदाजपत्रकामध्ये सहभाग नसेल किंवा अंदाजपत्रक अति महत्त्वकांक्षी असेल, तर लोकांची प्रेरणा कमी होते.
१९. अंदाजपत्रकाच्या विविध मर्यादा लक्षात घेऊनही अंदाजपत्रक आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे देतात हे मान्य करायलाच हवे आणि म्हणूनच दुर्मिख साधनांचा योग्य वापर होण्यासाठी नियोजन व नियंत्रणाचे साधन म्हणून अंदाजपत्रकाचा वापर अपरिहार्य आहे. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular