भाग २०
देणगीदारांसाठी करकपात
८० जी
प्राप्तीकर कायद्यातील u/S जी खाली करसवलत असणाऱ्या ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थेला देणगी दिली तर देणगीदाराला रक्कम त्यांच्या एकंदर प्राप्तीकरात सूट मिळू शकते.
मात्र देणगीदाराची रक्कम त्याच्या एकंदर प्राप्तीच्या १०% पेक्षा जास्त असता कामा नये. सवलतीसाठी रक्कम वगळून जी एकूण प्राप्ती असेल त्याच्या १०% जास्त नसावी. देणगी देण्गीदाराच्या एकूण प्राप्तीच्या १०% पेक्षा जास्त रक्कमेची असेल तर ही वरची रक्कम करसवलतीला पात्र असणार नाही.
संगणक वैदकीय उपकरणे, वाहने इत्यादी वस्तूच्या रूपातील देणगी असेल तर ती u/S ८० जी खाली सवलतीला पात्र नसेल. करसवलतीसाठी देणगी पैशाच्या रक्कमेच्या रुपातीलच असली पाहिजे. u/S ८० जी खाली करसवलतीला पात्र ठरवण्यासाठी ना-नफा तत्त्वावरील पूर्णपणे धर्मादाय ( धार्मिक नव्हे) व करसवलत पात्र संस्था असली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट धार्मिक समाज व जातीकरता काम करणारी नसावी.
एखाद्या विशिषधार्मिक समाज जिंव जातीच्या फायद्यासाठी फक्त काम करणारी ना-नफा तत्त्वावरील महिला आणि बालक निधी असा स्वतंत्र निधी निर्माण करू शकते. ह्या निधीला मिळालेल्या देणग्या u/S ८० जी खाली करसवलतीला पात्र ठरतील. मग ती संपूर्ण एखाद्या विशिष्ट धार्मिक समाज व जातीसाठी काम करणारी असली तरी चालेल महिला आणि बालकल्याणासाठी या निधीत मिळालेल्या देणगीचा आणि कल्याणासाठी दिलेल्या पैशाच्या स्वतंत्र हिशोब ठेवला पाहिजे.
राष्ट्रीय संरक्षण निधी, जवाहरलाल नेहरू स्मारक निधी, प्रधानमंत्री अवर्षण मदत निधी, जातीय सलोख्यासाठीचे राष्ट्रीय प्रतिष्ठान या सारख्या केंद्र वा राज्य सरकारने स्थापन केलेल्या निधींना मिळालेल्या देणग्या १००% करसवलतीला पात्र असतील. (देणगी दिलेली संपूर्ण रक्कम करातून वगळता येते) बिगर सरकारी, ना-नफा तत्त्वावरील ज्या स्वयंसेवी संस्थाना u/S ८० जी खाली प्राप्तिकरात सूट असेल त्यांना प्राप्तीतील ५०% रकमेवर सूट मिळेल.
ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थाना देणगीदाराला दिलेल्या पावत्यांवर चालू वैध ८० जी प्रमाणपत्राचा क्रमांक आणि तारीख असलीच पाहिजे; तसेच प्रमाणपत्र किती कालावधीसाठी वैध आहे ते नमूद केलेले असले पाहिजे.
मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च किंवा केंद्र सरकारने ऐतिहासिक पुरातत्व किंवा कलेच्या दृष्टीने महत्वाची म्हणून जाहीर केलेल्या वास्तू तसेच कोठल्याही राज्यातील वा राज्यांमध्ये ख्यातनाम सार्वजनिक प्रार्थनास्थळ यांच्या दुरुस्ती वा जीर्णोद्धारासाठी प्राप्तीकर कायद्याच्या U/S ८० जी (२) (vii) (ब) खाली करसवलत मिळण्यासाठी अर्ज करता येईल. दुरुस्ती वा जीर्णोद्धारासाठी देणगी देणाऱ्याला त्याच्या संपूर्ण प्राप्तीच्या हिशोबातील ५०% प्राप्तीवर करातून सूट मिळेल. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:- युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक