गल्लीतील पोरांची ट्यूशन घेणाऱ्या एका ताईच्या घरी पीठ आणि भाजीपाला नव्हता. पण आदबीने राहणारी ही महिला बाहेर येवून मोफत रेशन दिल्या जाणाऱ्या लाईनीत उभं राहायला बुजत होती .
मोफत रेशन वाटप करणाऱ्या तरूणांच्या जसाही हा प्रकार लक्षात आला तसा त्यांनी गरिब गरजवतांना काही वेळा पुरतं मोफत पीठ व भाजीपाला वाटप करणं थांबवलं.
शिकली सवरली पोरं होती. आपसात चर्चा करायला लागली व चर्चेमध्ये असं ठरलं की , ना जाणो कित्येक गरजू मध्यमवर्गीय लोकं मोठ्या अपेक्षेने मोफत रेशनच्या लाइनीकडे बघत असतात पण आपल्यातील आत्मसन्मानामुळे ते त्या ठिकाणी येवू शकत नाहीयेत.
विचार विमर्श झाल्यानंतर त्या तरूणांनी मोफत रेशन वितरणाचा बोर्ड बदलला व दुसरा बोर्ड लावला.
ज्यावर लिहिलं होतं की ,
“स्पेशल ऑफर”
- सर्व प्रकारचा भाजीपाला : 15 रूपये किलो,
- मसाले : मोफत .
- डाळ – तांदूळ -पीठ: 15 रूपये किलो..
बोर्डवरची सूचना वाचून भिकारी व गरीबांची गर्दी कमी झाली व मध्यमवर्गीय परिवारातील गरजू लोकं हातात दहा वीस पन्नास रूपयांची नोट पकडून खरेदी करण्याच्या लाईनीत उभे राहीले. आता ते निश्चिंत होते व स्वाभिमानाला धक्का लागणारी गोष्ट होणार नव्हती.
ह्याच लाईनीत ट्यूशन घेणारी ताई पण आपल्या हातात थोडेफार पैसे घेवून उभी होती व तिचे डोळे पाणावले होते पण त्यात बुजरेपणा नव्हता.
तिची वेळ आली, तिनं आवश्यक वस्तू व जिनसा घेतल्या, पैसे दिले व शांत चित्ताने घरी आली. सामानाची पिशवी सोडली. बघितलं तर जे पैसे तिने वस्तू खरेदीला दिले होते ते सगळे पैसे त्या पिशवीत होते.
त्या तरूण पोरांनी तिचे परत त्या थैलीत टाकून दिले होते.
पोरं प्रत्येक खरेदी करणाऱ्यासोबत असंच करत होती.
हे खरं आहे की ज्ञान व सभ्यपणा हे अज्ञान व असभ्यपणा पेक्षा श्रेष्ठ आहे .
मदत करा पण कुणाचाही स्वाभिमान दुखवू नका. गरजू व्हाईट काॅलरवाल्यांचीही काळजी घ्या. प्रतिष्ठित गरजवतांचा आदर करा.
आणि विश्वास ठेवा की सेल्फीपेक्षाही जास्त समाधान मिळते
सो- सोशल मीडिया
मुख्यसंपादक