महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ऑक्टोंबर १८६९ रोजी सौराष्ट्रातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाला. नंतर ते लंडनला गेले आणि बॅरिस्टर बनले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गेले आणि वकिलीचे शिक्षण घेतले. तिथे राहून त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र आणले. दक्षिण भारतात काळे-गोरे असे वंशभेद चालत त्यामुळे काळा लोकांना कमी लेखले जाई. त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि काळ्या लोकांना कमी लेखले जाई.त्याविरूद्ध त्यांनी लढा दिला आणि काळ्या लोकांना न्याय मिळवून दिला. भारतात परतल्यावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यात त्यांची शस्त्रे होती सत्याग्रह आणि अहिंसा. त्यांनी प्रत्येकावर प्रेम करायला शिकवले. ते स्वतः आश्रमात राहून स्वावलंबनाचे धडे देत.
त्यांनी आश्रमातील सर्वांना चरखा चालवून कपडे विणायला शिकवले. आपल्या देशातील गरिबी पाहून त्यांना दुःख होई. ते पंचा आणि धोती वापरत. त्यांच्या पत्नी कस्तुरबा त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात प्रोत्साहन देत.लोक गांधीजींना प्रेमाने बापू म्हणत. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो. त्यांच्या थोर कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली. त्यांचे कार्य आणि बलिदान आपल्याला आजही स्मरणात आहे महात्मा गांधी आपल्या देशातच नव्हे तर सार्या जगभर प्रसिद्ध आहेत. भारतात परत आल्यावर ते ब्रिटिशांच्या अत्याचारा विरुद्ध लढले. त्यासाठी त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा ही दोन हत्यारे वापरली. गांधीजींचे राजकीय गुरू भारतसेवक समाजाचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले हे होते. गांधीजींनी आपले आयुष्य आयुष्य साबरमती आश्रमात व्यतीत केले. पत्नी कस्तुरबा यांचा गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा होता. स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली लाज असा त्यांचा सवाल असे. आपल्या देशातील गरीब व दलित लोकांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. खादी प्रसार आणि ग्रामसुधार याविषयी त्यांनी सतत पाठपुरावा केला. आपला भारत देश खेड्यांचा देश आहे.८०% लोक खेड्यात राहतात त्यामुळे देशाचा विकास साधायचा असेल तर खेड्याकडे चला असा असा त्यांचा संदेश होता. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते अविरत झटले.१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. प्रत्येक देशवासीय स्वातंत्र्याचा हा सोहळा उपभोगत असताना ३०जानेवारी १९४८रोजी नथूराम गोडसे नावाच्या माथेफिरूने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. संपूर्ण देश दुःखसागरात बुडून गेला. देशभर शोककळा पसरली. गांधीजी हे सत्य अहिंसा प्रेम आणि मानवतावादी यांचे पुजारी होते हे त्यांनी आपल्या कृतीतून देशवासियांना दाखवून दिले.
- सौ.भारती सावंत
मुंबई
समन्वयक – पालघर जिल्हा