केवढा मोठा हा आजार
शेतकऱ्यांचा दुःखाचा भरला हा बाजार
मरणाच्या यातना सोसत गुरं ढोरं
लम्पी तू नायसा हो लवकर
शेतकरी भयभीत बेचैन
रोग संपुदे याचेच चिंतन
आसवांचा बांध फुटलाय आता
शेतकरी माझा दुःखी झालाय आता
पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण
माझं गुर ढोरं आणि संसार चालला काट्यातून
मुक्या पशूंची ही वेदना
ह्या रोगापासून ईश्वरा तूच वाचव ना
✍️ कवी:- स्वप्नील जांभळे
(दापोली).
मो 9619774656
समन्वयक – पालघर जिल्हा