Homeमुक्त- व्यासपीठशर्यत जगण्याची…..

शर्यत जगण्याची…..

काल रात्रीच माझ्या मुलीसोबत मैदानात काही वेळ फेरफटका मारण्यास गेले होते ,  बराच वेळ तिच्या सोबत घालवल्या नंतर आम्ही काही वेळेत परतणारच होतो इतक्यात मैदानात मोबाइल ची बॅटरी लावून एक व्यक्ती तेथे बसण्यासाठी जागा करत होती , त्यांनतर त्यांनी खाली पेपर अंथरून त्यावर  टिफिन ठेवला मी विचार करत होते इथून २ मिनिटाच्या अंतरावर च पोलीस कॅन्टीन आहे मग या व्यक्ती इथे अंधारात का बर जेवत असावेत . त्यात त्यांच्या शरीरावर  काळे जॅकेट आणि खाकी ड्रेस दिसत होता.

काही बोलू की नको याच विचारात होते कारण ते नवीन असतील तर त्यांना जेवण्यासाठी योग्य जागा सांगावी हाच एक उद्देश पण जर त्यांना इथे अंधारात जेवण्याची इच्छा असली तर काय बोलावं, असू शकते का ?  किंव्हा इथे च जेवत असावेत किंव्हा ड्युटी लागली असावी काय सांगावं.
हा पण विचार आलाच शेवटी ते टिफिन खोलून जेऊ लागले . मी हि आमच्या माय लेकीच्या गमतीत गुंग झाले . काही वेळाने माझी मैत्रीण आली गप्पा रंगल्या त्यावर ती ही म्हणाली हे सर अंधारात का जेवत असावेत बर …. ?

शेवटी आम्ही दोघीनींही त्यांना  विचारलंच ” सर इतक्या अंधारात मोबाइलला ची बॅटरी लावून का जेवत आहात इथे च तर बाजूला कॅन्टीन आहे “

त्यावर ते म्हणाले ” म्याडम मी इथे नवीन आहे आजच आलो आहे “

मी म्हणाले ” सर  हरकत नाही इथे बाजूलाच कॅन्टीन आहे तुम्ही तिथे जेऊ शकता. काय करता तुम्ही ? “

“बर चालेल म्याडम म्हणत ते म्हणाले मी होम गार्ड आहे, आसनगाव ला राहतो दादर ला माझ्या मावशींकडून टिफिन आणून मी इथे जेवायला बसलो आहे, पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे. याच मैदानात माझी सकाळी रनिंग प्रॅक्टिस करतो आणि रात्रीचा अभ्यास , आणि सायन ला माझी १२ तासाची ड्युटी असते. त्यामुळे मी येथे जेवत होतो.

ऐकूनच मन हादरलं कि अस ही जीवन आहे आणि खरच खूप त्रास आहे नोकरी करण म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. होमगार्ड चा पगार आधीच कमी त्यात २ -२ महिने होत नाही त्यात ते तरी काय करणार  आणि घर कसे सांभाळणार .
पुन्हा मी त्यांना विचारलं जेवण तर झालं पण येथे मुक्काम कुठे करणार काही ओळख तर नाही त्यावर ते म्हणाले ” येथे मैदानातच झोपेन कोणी फारसे ओळखीचे नाही येथे मॅडम त्यात वस्तीसाठी ओळखीचे जरी असले तरी म्हणून कुणाकडे बोलण योग्य नाही.

माझ्या पगारामुळे रूम पण जवळ भेटत नाही म्हणून इतक्या दूर घेतली.
आता तर काही बोलाव समजत च नव्हतं. तरीही आम्ही दोघींनी आम्हाला तेथे माहीत असलेले ठिकाण सांगून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण भरती होई पर्यंत ती व्यक्ती इतक्या गारठ्यात त्या मैदानात झोपून अजून च आजारी पडली असती.
 

आपल्या या नोकरीच्या प्रत्येक स्तरावर अश्या खूप साऱ्या व्यक्ती भेटतील जे खरच कसोटीने जगत आहेत , म्हणजे प्रत्येक मुंबईकरच मी म्हणणार नाही ती प्रतेक व्यक्ती राबत आहे जिला शून्यातून वर यायचं आहे , आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत , आपल्या घरच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत , आपली ध्येय , स्वप्न पूर्ण करावयाची आहेत.

नोकरी शेतात राबणारी असो की रस्त्यावरचा केर काढणे , की खुर्चीवर बसून म्यनेज मेन्ट करणे  , भारत भू चे  रक्षण करणे असो , जागोजागी उभं राहून सेवा पोहोचवणे असो  सर्वच महत्वाच्या आहेत . या सर्व नोकऱ्या आपल्या एकमेकांच्या गरजेशी  निगडित आहेत. या निभावताना खूप कसरत करावी लागते  . शेतात उन्हात राहून काबाड कष्ट करणे , काळ्या मातीतून पोट भरेल इतकं अन्न धान्य उत्पादन करणे , १२ -१२ तास दवाखाण्यात डॉक्टर , नर्स पेशंट ची काळजी घेणे , जेवणाचे डब्बे पोहोचवणे ,  उद्योग धंदे वाढवण्यासाठी बाहेरगावी इकडे तिकडे मीटिंग घेणे , ५-६ महिने शिप वर राहून नेव्ही ची ड्युटी सांभाळणे असो कि बस कंडक्टर पासून ड्राइवर असो , आपल्या देशाच्या रक्षणासाठी छातीवर बंदुकीची गोळी घेण्यापर्यन्त आपली नोकरी म्हणजे जीवघेणीच आहे .  लोकल ट्रेन पकडन्या ची   कसरत करण्या पासून , सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाला माझा मानाचा मुजरा.

वरील सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असली तरी बऱ्याच आयुष्यातल्या समाधानाच्या गोष्टी आपण हरवत चाललो आहोत .

या सर्व काळात आपले शारीरिक आरोग्य , मानसिक आरोग्य  , आपली नाती , आपले महत्वाचे छंद , आपल्या आवडत्या व्यक्ती सोबतचा वेळ  घालवणे , मित्रा सोबत वेळ घालवणे , आई वडील मुलासोबत वेळ घालवणे  राहून जात आहे .

जन्माला येतो तेंव्हा पासून शाळा सुरूं होते तेंव्हापासून च शर्यत चालू राहते तू शिकला नाहीस तर चांगली नोकरी नाही भेटणार ,आणि नोकरी नाही तर काही नाही.  नोकरी नाही तर खूप कष्ट घ्यावे लागणार . कष्ट कुठेही चुकले नाहीत . नोकरी नाही म्हणून कोणतीही व्यक्ती शांत नाहीय  मग भलेही चहा विकूनच का असेना तो आपल्या जबबादाऱ्या पार पाडत असते. किंव्हा छोटा मोठा व्यवसाय करत असते . शाळेच्या मार्कलिस्ट वर किती टक्के भेटले हे ठरवत नाही कि आपण कुठे पोहोचणार आहोत. आपल्यात असणारे बळ आपल्यांत असणारे कार्यशैली , विचार , ध्येय , स्वप्न आपल्याला योग्य त्या ठिकाणी पोहोचवतात . आयूष्यात  या सर्व गोष्टी होत राहणार च आहेत. येथे सर्व गोष्टी मिळवण्याची शर्यत आहे त्यात उतरून आप आपल्या परीने प्रयत्न करत बाहेर निघायचे आहे हेच आयुष्य आहे. जो तो कसोटीचे प्रयत्न करत आहे.

यात फक्त सांभाळा तो आपल्यातला समतोल , नात्यांचा , वेळेचा , स्वतःच्या इच्छा अपेक्षेचा वेळ त्यांना ही द्या.

वरील प्रमाणे भेटलेल्या व्यक्ती सारखे काबाड कष्ट करत करत च पुढे जाणे गरजेचं आहे. सध्या च्या बेरोजगारीचे जे संकट आले आहे त्यातुन बाहेर निघायचे आहे . काहीतरी नवीन करत रहा. काहीतरी नवीन स्टेटस बनवत राहा.
आणि यशस्वी व्हा.
 

कष्ट करत करत स्वतःची काळजी घेणे विसरू नका.

धन्यवाद … !

  • – रुपाली शिंदे

( आजरा, भादवन )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular