Homeमुक्त- व्यासपीठसौभाग्यालंकार बांगडी घालण्याचे फायदे कोणते?

सौभाग्यालंकार बांगडी घालण्याचे फायदे कोणते?

बांगडी हा अतिप्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा मनगटावर धारण करावयाचा एक अलंकार आहे. याला ‘चुडा'( सौभाग्य ) असे म्हणतात.

१ ) महाराष्ट्रात लग्नाच्या आधी वधूला भरावयाच्या बांगड्यांना ‘लग्नचुडा’ असे म्हणतात. तो मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो.

२ ) बंगालमध्ये प्रामुख्याने शंखांच्या बांगड्यांना सौभाग्यालंकार मानले आहे. तेथे विवाहप्रसंगी वधूला लाल व पांढऱ्या रंगांचा चुडा भरण्याची प्रथा आहे. विवाहानंतर वधू ज्यावेळी पहिल्यांदा सासरी येते, त्यावेळी नवऱ्या मुलाची आई वधूच्या डाव्या हातामध्ये एक धातूची बांगडी घालते, त्यास ‘वज्रचुडा’ असे म्हणतात.

३) पंजाब, गुजरात व राजस्थानमधील सुवासिनी स्त्रिया सौभाग्यालंकार म्हणून हस्तिदंताच्या बांगड्या घालतात. पंजाबमध्ये वधूला लाल व पांढऱ्या रंगाचा चुडा भरतात. वधूला भरावयाच्या लग्नचुड्यासाठी पंजाबमध्ये ‘चुडाचंदन’ व राजस्थानमध्ये ‘इचुरा’ असे कार्यक्रम साजरे केले जातात.

४) गुजरातमध्ये वधूच्या हिरव्या व लाल काचेच्या बांगड्या भरतात. त्याला ‘चुडो’ असे म्हणतात.
उत्तर भारतात काचेच्या व लाखेच्या चुड्यांना सौभाग्यालंकार मानले जाते. साधारणपणे काचेच्या, शंखांच्या, सोन्याच्या, पितळेच्या अशा विविध प्रकारच्या बांगड्या भारतातील अनेकविध प्रदेशांतील सुवासिनी स्त्रिया मुख्य अलंकार म्हणून नित्यनेमाने वापरतात. कंगण, कंकण, चुडा, पाटली, बिलवर, गोट, धातूचे कडे इ. नावे बांगड्यांच्या विविध प्रकारांना आहेत.

यजुर्वेदामध्ये सोन्याच्या बांगड्या विवाहप्रसंगी घालाव्यात, असा निर्देश आहे. संस्कृत साहित्यात कंकणाचा वारंवार उल्लेख आढळतो. लग्नामध्ये वधूवर एकमेकांच्या हातात बांधतात, ते कंकण सुताचे असते. त्याला ‘सूत्रकंकण’ असे म्हणतात. चूड व अर्धचूड हे कंकणाचेच प्रकार. चूड म्हणजे सोन्याच्या तारेचे मोठे कंकण व अर्धचूड म्हणजे बारीक कंकण. चूड यालाच मराठीत चुडा असे म्हणतात. आपला चुडा अर्थात कंकण वज्राचे व्हावे म्हणजेच आपले सौभाग्य अभंग राहावे, अशी प्रत्येक सुवासिनीची आकांक्षा असते. त्यासाठी ती व्रतेही करते. भारतातील नानाविध प्रदेशांच्या लोकगीतांतून सुवासिनींची चुड्याविषयीची आसक्ती मनोभावे व्यक्त झाली आहे.

कंकण –

हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा दागिना आहे. कंकण धातूचे ,काचेचे किंवा सुताचे सुद्धा असतात.सुताचे कंकण हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रात लग्नामध्ये नवरा व नवरी यांच्या हातामध्ये बांधण्याची परंपरा आहे.जे कंकण सोन्याचे असतात,त्यांना बांगड्या किंवा बिलवर असेही म्हणतात.कंकण चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड असू शकतात.लग्नात कंकणाच्या जोडीला हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरायची पद्धत आहे.ते सौभाग्य लक्षण मानले जाते. एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्याने घेतली तर त्याने त्या गोष्टीसाठी ‘कंकण बांधले’ असा वाक्प्रचार वापरला जातो.

पाटल्या –

साधारणतः,५ ते १० मी.मी.रुंद व सुमारे १/४ ते १/२ मी.मी.जाड सोन्याच्या पत्र्यापासून बनविलेली चापट बांगडी.परिधान करणाऱ्याचे मनगटाचे जाडीनुसार याची गोलाई करण्यात येते.याच्या बाह्य आवरणावर कलाकुसर असते.या शुद्ध सोन्यापासून बनविण्यात येतात. हा स्त्रीयांनी बांगडीसारखा हातात घालावयाचा अलंकार आहे.

बांगडी घालण्याचे फायदे –

बांगडी मनगटावर घासली जाते ज्याने हाताचं रक्त संचार वाढतं. हे घर्षण ऊर्जा व्युत्पन्न करतं ज्याने लवकर थकवा जाणवत नाही.
बांगडी घातल्याने श्वासासंबंधी आजार, हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत मिळते.
तुटलेली बांगडी घालू नये. याने नकारात्मक ऊर्जा वाढते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular