Homeमुक्त- व्यासपीठस्वयंपाकाची कविता

स्वयंपाकाची कविता

तव्यावर चपातीचा फुगा जसा फुगला,
तसा मी त्यात माझ्या कवितेचा संग्रह ठेवला,

भाजीला जिरी मोहरीची फोडणी जशी,
माझ्या कवितेची सुगंधी दरवळ वाढली तशी,

आमटी तयार होताच त्यावर कोथिंबीर भुरभुरली जशी,
कविताही माझी फुलत जाई भारी तशी,

माश्याच्या कालवणात थोडीशी आंबटाची आठोळी घातली,
तशी कविता माझी सुंदर थाटली,

भाजीला उकळ येता जशी तुपाची धार सोडली,
तशी कविता माझी मधुर चालीने बहरली,

कोथिंबिरीला मिठाची साथ जशी,
कवितेला माझ्या माझी साथ तशी,

अट्टाहासाने केलेल्या भाजीला चव यावी सुंदर जशी,
माझी कविताही सुंदर भारी घडली तशी घडली तशी…

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. नमस्कार…🙏
    खूप छान, सुंदर कविता आहे.
    आपण रोजच घरात जेवण करतो. परंतु हे जेवण करताना भल्या भल्यांची तारांबळ उडते.
    आपल्या घरातल्या स्रीया नेहमीच रुचकर जेवण बनवून आपल्याला खायला घालत असतात. जेवण करत असताना ज्या गमती जमती होतात त्या आपण या कवितेत सुंदर मांडल्या आहेत.
    कविता खूपच छान आहे.

    धन्यवाद…!!💐

- Advertisment -spot_img

Most Popular