Homeमुक्त- व्यासपीठहा लेकाचा गुंड पण पोलीस कसा झाला..

हा लेकाचा गुंड पण पोलीस कसा झाला..

सत्यजित समई
हा आमचा सर्वात जवळचा आणि शाळेतला जुना मित्र आहे. सर्वात जवळचा असल्यामुळे जरा आजचा लेख थोडासा गमतीदार लिहिणार आहे.
हा दिसायला गुंड, चोर, धूर्त, लफंगा , काळे धंदे करणारा, खोटारडा असा जरी वाटत असला तरी तो खरंच मुळीच तसा नाही. चेहऱ्यावरून काही सांगता येत नाही म्हणतात ना ते अगदी सत्य आहे.
तर चेष्टेचा विषय सोडून तो प्रत्यक्षात कसा आहे हे पाहू. त्याच्या मावशीला मुले नसल्यामुळे तिची मावशी त्याला आपल्या मुलासारखे सांभाळते आणि माया लावते. लहानपणापासून मावशी त्याला आपल्या गावी हलकर्णी येथे बोलवून त्याचा सांभाळ केला व त्याला नववी पर्यंत शिक्षण दिले. मावशीची शेती जास्त असल्यामुळे तो वेळ मिळेल तेव्हा शेतीची कामे करत असे. जनावरे पण असल्यामुळे त्यांचा सांभाळ सुद्धा त्याने केला. त्यामुळे कष्ट करण्याचे उपजत गुण त्याला मावशी आणि आज्जीकडून मिळाले.
तो लहान असल्यापासून एकदम उत्साहित आणि नेहमी प्रसन्न असल्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व विकास खूप सुरेख झाला आहे.
गजानन पाटील, बाळू पाटील आणि श्रीकांत हत्तरकी हे त्याचे सर्वात जवळचे मित्र शाळेत होते. एकदा शाळेत व्हसकोटी सर सायन्स शिकवत असताना पाळीव प्राणी कोणते असतात हे शिकवत होते. तेव्हा समईचे लक्ष नव्हते. सरांनी हे हेरले आणि त्याला उभे करून ” पाळीव प्राणी कोणते आहेत?” हा प्रश्न विचारला. तेव्हासुद्धा याचे लक्ष कोणता प्रश्न विचारला आहे याकडे नव्हते. त्याच्या शेजारी बसलेला मित्र संभाजीने, “पाळीव प्राण्यांची नावे सांग म्हटला” आणि त्याने गडबडीत मोठ्या आवाजात “उंदीर” हे उत्तर दिले. त्याचे ऐकून सर्व वर्ग मोठ मोठ्याने हसू लागला. सर सुद्धा हसत होते पण ते चिडले नाहीत. तेव्हा पासून त्याला “इली पिटक” ( कन्नड भाषेत उंदीरला इली पिटक म्हणतात) या नावाने चिडवू लागले.
शाळेत असताना अभ्यासात त्याची प्रगती खूप कमी होती. १० वी मध्ये तो सिंधूदुर्ग येते गेला आणि त्याची अभ्यासात प्रगती झाली. पुढे त्याने पदविका फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण करून त्याने त्या क्षेत्रात थोडी वर्षे नोकरी केली. या क्षेत्रात त्याला खूप वेळ काम करावे लागत असल्या कारणामुळे त्याने हे सोडून मार्केटिंग आणि सेल्स या बँकेच्या विभागात काम मिळवले. संभाषण कौशल्य उत्तम असल्या कारणाने त्याला या क्षेत्रात खूप यश आणि पैसा मिळाला. तो सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम पाहत आहे.
फेस बुकच्या माध्यमातून त्याची आणि माझी खूप वर्षांनी भेट झाली. त्याचा अकाऊंट वर पोलिस वेशात फोटो पाहून त्याला मेसेज केला की, मला खूप अभिमान वाटतो तुझा, तू पोलिस यंत्रणेत काम करतो म्हणून. तेव्हा त्याने मेसेज केला की, भाई तो फोटो एका सीरियल मधला आहे. मी या क्षेत्रात काही दिवसापासून काम करत आहे. मग माझे कुतहूल वाढले आणि त्याला कोणत्या सीरियल मध्ये काम केला याची माहिती घेतलो. त्याने एका सीरियल मध्ये राक्षसाची भूमिका केला होता.ऐकून मनात म्हटलो की, हा राक्षसाच्या पेक्षा भयानक आहे. त्याने सावधान इंडिया तसेच क्राईम पेट्रोलमध्ये काम केले आहे. तसेच मुंबई पोलिस या मराठी चित्रपटात काम केले आहे. परत ऐकल्यावर मनात प्रश्न आला ( या लेकाच्याला गुंडाची भूमिका शोभते आणि याला पोलिसाची भूमिका प्रत्येकवेळी का देतात? )
आमचे जेव्हा हे मेसेजद्वारे संभाषण चालू होते तेव्हा रात्रीच १ वाजले होते आणि तो त्या दिवशी रात्री कामावरून घरी उशिरा आला होता. वहिनींनी जेवण्याचे ताट समोर ठेवले होते. पण हा माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत होता. ( सध्यापण कोणी तावडीत सापडले तर माझ्या प्रश्नांची रेलचेल चालूच असते. काहींना अनुभव आला असेल माझा.) तो उत्तरे देत होता आणि थोड्या वेळाने म्हटला की, “भाई जेवतो” त्याचे बोलणे ऐकून मला सुद्धा वाईट वाटले. त्याची माफी मागितली तेव्हा तो म्हटला की, अरे जावू देत खूप वर्षांनी बोलत आहेस”. त्याला माझ्या बद्दल असणारा आदर आणि प्रेम दिसून आले.
मागच्या वर्षी तो एका बीच वर गेला होता तेव्हा तिकडे मौज मजा करायचे सोडून हा मला व्हिडिओ कॉल करून बीच दाखवत होता. यावरून वाटले की, खरंच मित्र असावा तर असा, कारण असा समुद्र किनारा पाहून त्यात आनंद घेण्यापेक्षा याला माझी आठवण आली.
तो जरी मोठ्या हुद्द्यावर काम करत असला तरी, तो माझ्यासाठी “सम्याच” आणि इतरांसाठी “जित्या” असणार आहे, कारण लहानपापासूनच त्याला या नावाने हाक मारत असायचो. त्याचा आज वाढदिवस आहे त्याला चांगले आरोग्य तसेच आनंदमय जीवन मिळो ही सदिच्छा.

तुमच्याही शाळेत असा काही किस्से घडले आहेत का ? आम्हाला नक्की कळवा…

लेखन – श्री. सनी चंद्रकांत कुंभार.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular