हूंकार जगदंबेचागडावरूनी शिवनेरीच्या ,हूंकार जगदंबेचा उठला.आई जिजाबाईंंच्या उदरी,जंन्म शिवरायांचा झाला. १
पुंण्याई ती भोसले कुळाची, फळाला वास्तवात आली.स्वप्नपूर्ती ती शहाजीराजांची,जंन्माने शिवरायांच्या झाली.२
असह्य जगणे मायभगिनींचे ,करूणा देवी शिवाईशी आली. कडेकपारी ती सह्याद्रीची ,पुलकीत आनंदाने झाली. ३
पावनभूमी ती मायमराठी ,यवनांच्या त्रासाने गांजली .शिवबांच्या जंन्माने सारी ,चराचर सृष्टीही सुखावली.४
मिळवूनी मावळे ते सारे ,शपथ स्वराज्याची घेतली.साधूनी शक्ती बुद्धीचा संगम.नितीमूल्यांची स्धापना केली.५
बाजी,तानाजी मुरारबाजी ,कामी स्वराज्याच्या आले.कित्येक शूर मावळ्यांनी ,जीवन मायभूमीशी दिधले.६
राज्याभिषेक शिवरायांचा,अनुपंम्य तो सोहळा होता.मानवतेच्या मंदीरातील ,देव माझा छत्रपती होता.७
मंगलक्षणी या शिवजयंतीच्या,नतमस्तक होवूनी शिवचरणी.वाहतो माझी काव्यपुष्पांजली,प्रणिपात मनोभावे छत्रपती चरणी.८
शिवभक्त कवी. श्री रेवाशंकर वाघ ठाणे,
मुख्यसंपादक