आजरा – : संकेश्वर बांदा महामार्ग साठी MIDC येथे उभा केलेल्या टोल वसुली नाक्यावर टोलमुक्ती साठी आजरा तालुक्यातील शेकडो च्या संख्येने उपस्थित असणाऱ्या जनतेने भव्य मोर्चा कादून टोल हद्दपार ची मागणी केली. याचे नेतृत्व संकेश्र्वर बांदा महामार्ग टोलमुक्त संघर्ष समितीने केले. त्याला व्यापारी वर्गाने ही जाहीर पाठींबा देत बंद ची घोषणा यशस्वी केली.
मिनर्वा हॉटेल पासून सुरू झालेल्या या मोर्चात तोप्यांनी लक्षवेधी भूमिका घेतली. तसेच टोलमुक्ती मिळालीच पाहिजे , टोल रद्द झालाच पाहिजे अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कॉ. संपत देसाई यांनी महामार्गामुळे प्रवास सुखाचा होईल म्हणून सहकार्य केले पण टोल चे भूत आमच्या मानगुटीवर बसले आणि रस्ता चार पदरी किंवा सहा पदरी झालेला नसून रस्ताचे रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे असे असताना टोल का घ्यायचा अशी भूमिका स्पट घेतली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनी द्वारे जनतेशी संपर्क साधला व टोल प्रश्न आजरा तालुक्यातील जनतेला त्रास होणार नसल्याची काळजी घेतली जाईल. आमदार आबिटकर म्हणाले पर्यटकांना टोल बसवण्याच्या नादात आजरा तालुकावासियांना आर्थिक फटका बसणार आहे संकेस्वर बांदा रस्त्याबाबत कोणतेही स्पष्टता नसताना हा महामार्ग कसा होऊ शकतो. टोलमुक्ती चा आजरा पॅटर्न देशभर नेऊया . माजी आमदार के.पी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग आणि आजराजवलच्या टोल नाक्या ला आमचा विरोध आहे. तर जिल्हा बँक संचालक ए वाय पाटील म्हणाले टोलमुक्ती च्या लठ्यात आंदोलकांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्याला कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. टोलच्या रूपाने तालुक्यावर अन्याय होत आहे. विधीज्ञ शैलेश देशपांडे म्हणाले, महामार्गाचे काम घाईत करण्यात आले आहे. एक रुपयाही न देता या महामार्गावरून प्रवास करणे हा तालुक्यातील जनतेचा हक्क आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे म्हणाले, आता जर टोल लागला तर तो आयुष्यभरासाठी लागणार आहे त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, उल्हास त्रिरत्ने यांनी मनोगत व्यक्त केली. टोलमुक्ती आंदोलनाला आजरा तालुक्यातील व्यापारी संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, सरपंच संघटना, आजरा साखर कारखाना कामगार, तोडणी ओढणी वाहतूकदार व इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याची संचालक विष्णुपंत केसरकर, उदयराज पवार, डॉ. अनिल देशपांडे, सुधीर कुंभार, बाळ केसरकर. संजय सावंत, नामदेव नार्वेकर, रवींद्र भाटले, दशरथ अमृते, रचना होलम, एम. के. देसाई, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, रशीद पठाण यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय पाटील यांनी आभार मानले.
मुख्यसंपादक