Homeघडामोडीग्रुप ग्रामपंचायत गवसे - आल्याचिवाडी उपसरपंचपदी यल्लाप्पा बागडी

ग्रुप ग्रामपंचायत गवसे – आल्याचिवाडी उपसरपंचपदी यल्लाप्पा बागडी

आजरा (हसन तकीलदार ):-ग्रुप ग्रामपंचायत गवसे -आल्याचिवाडीचे उपसरपंच अविनाश हेब्बाळकर यांनी ठरल्याप्रमाणे आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यल्लाप्पा बागडी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.


अविनाश हेब्बाळकर हे मागील दोन वर्षापासून उपसरपंच पदावर विराजमान होते परंतु ठरलेनुसार त्यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा मंजूर झालेनंतर यल्लाप्पा बागडी यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. बागडी यांचे नाव अविनाश हेब्बाळकर यांनी सुचवले तर सौ. सोनाली महेश पाटील यांनी याला अनुमोदन दिले. यावेळी सरपंच रेखा पाटील, सोनाली पाटील, सुषमा मांडवकर अविनाश हेब्बाळकर, ग्रामसेवक विशाल दूंडगेकर आदिजण उपस्थित होते.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular