Homeघडामोडीमहिलांच्या सक्षमीकरणातून ग्रामीण विकासाचा नवा मार्ग : पंचायत समितीची भूमिका काय असावी...

महिलांच्या सक्षमीकरणातून ग्रामीण विकासाचा नवा मार्ग : पंचायत समितीची भूमिका काय असावी ?

आजरा ( अमित गुरव ) -: ग्रामीण विकासाची खरी ताकत जर कोणाच्यात आहे तर त्या आहेत ग्रामीण महिला. आजरा गडहिंग्लज चंदगड या भागात अनेक महिला दुग्धव्यवसाय, शेती, बचत गट आणि लघुउद्योगातून कुटुंब व्यवस्थापनेची जबाबदारी सांभाळताना दिसतात. मात्र त्यांना सुरक्षितात, बाजारपेठचा आभाव आणि रोजगाराच्या मर्यादित सीमा आजही कायम आहेत ; योजनाची अपुरी अंमलवाजवणी ही समस्या तर आहेच. पण आता उरतो तो पंचायत स्तरावर असे कोणते बदल घडवून आणता येतील? आणि ही मानसिकता प्रशासनाची असेल तर त्यांनी पुढील काही गोष्टीचा आधार घेतील का?

1) महिला बचत गटाना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी काय करावे?
आजरा तालुक्यात अनेक महिलांना बचत गट आहेत. जे त्या आपल्या गावोगावी सक्षम पणे चालवत आहेत. त्यामध्ये काही जणी लोणचे , पापड, इतर खाद्यपदार्थ तयार करतात. पण असे असले तरी त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळत नाही.
पंचायत समितीने पुठाकार घेत त्यांना प्रत्येक महिन्याला महिला बाजार आयोजित करावा , तालुकास्तरावर ग्रामीण उत्पादने विक्री केंद्र सुरु करावे, शासकीय कार्यालये, अंगणवाडी, शाळा , आणि वसतिगृहात महिला गटांची उत्पादने खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्यावे तसेच ऑनलाईन विक्रीसाठी प्रशिक्षण आणि डिजिटल मार्केटिंग सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

2) महिला सुरक्षिततेसाठी ताबडतोब गावापातळीवरील पाऊले?
महिला सुरक्षितात ही केवळ पोलिसांची नाही तर नागरिकांची जबाबदारी आहे तेव्हा गावागावातात जेथे अंधारे रस्ते आहेत तेथ पथदिवे लावावेत, शाळा महाविद्यालय मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सुरक्षा समित्या, मोफत स्वसंरक्षण शिबीरे , तक्रारीसाठी संपर्क क्रमांक व्यवस्था कराव्यात.

3) योजना कागदोपत्री न राहता अमलात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत..
ग्रामीण भागासाठी सरकारच्या नानाविध चांगल्या योजना असतात पण त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यत पोहचत नाही किंवा अंमलबजावणी काही कारणास्तव अपुरी राहते त्यासाठी प्रत्येक योजनेसाठी एक अधिकारी निश्चित करणे आणि त्याच्यावर त्या उपक्रनाची जबाबदारी देणे, ग्रामसभेत दर तीन महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणे, पंचायत समितीच्या वेबसाईट वर माहिती अपडेट करणे, नागरिक आणि पत्रकारांना देखील उपक्रमात सहभागी करुन घेणे हे उपाय करता येतील.

4) घरगुती हिंसाचार आणि कौटुंबिक वादावर उपाय करणे आत्यावशक आहेच. कारण आजही अनेक महिलांना हा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यासाठी तालुकास्तरीय समुपदेशन चालु करावे. कायदेशीर मदत आणि मोफत सल्ला केंद्र सुरु करावे, गावोगावी जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.

5) महिलांच्यासाठी रोजगार निर्मितीची दिशा म्हणून आजरा, चंदगड, गडहिंग्लज परिसरात कृषी आणि वनसंपत्ती खुप आहे तेव्हा तिथं सेंद्रिय शेती प्रक्रिया उद्योग, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, मधमाशी पालन, औषधी वनस्पती लागवड, मशरूम उत्पादन , शिवणकला व वस्त्रनिर्मिती, शेतीपूरक इतर उद्योगाणा चालना देण्याचे काम करावे.
महाराष्ट्रात हिरवे बाजार ( अहमदनगर ) येथे महिलांच्या बचत गटांनी आर्थिक क्रांती घडवली आहे. बारामती मध्ये बचत गटाच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली. गडचिरोली येथे वणउत्पादन प्रक्रियेतुन महिलांना खुप प्रमाणात रोजगार मिळाला आहे.
या सर्व यशोगाथा मध्ये माझ्या आजरा तालुक्याचे नाव येण्यासाठी आजरा येथे महिला उद्योजिका महोत्सव , प्रत्येक गावात महिला व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, महिला उत्पादणे खरेदीसाठी जिल्हास्तरीय प्रदर्शने, पर्यटना संदर्भातील गृहउद्योग यातील काही कल्पना किंवा इतरांच्या कडुन ही अन्य काही कल्पना देण्याचे आवाहन बिडीओ किंवा सभापती यांच्या माध्यमातून करावे.

महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि स्वावलंबण मिळाले तरच विकसित गाव समृद्ध गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल.

आपल्या गावात महिलांच्या रोजगार , सुरक्षितता, आणि बचत गटाबाबत कोणत्या समस्या आहेत? आपली मते आम्हाला नक्कीच कळवा.

असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी link marathi व्हाट्सअप चॅनेल ला फॉल्लो करा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular