आजरा तालुक्यातील खेडे (मुळगाव) येथील रहिवासी, नीता ट्रॅव्हल्सचे मालक आणि युवा उद्योजक श्री. सिकंदर आप्पालाल पठाण यांचे उपचारादरम्यान आज दुःखद निधन झाले.
दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
सिकंदर पठाण हे स्व. आप्पालाल पठाण यांचे चिरंजीव तसेच स्व. वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. रशिद पठाण यांचे पुतणे होते. पंचगंगा हॉटेल व नीता ट्रॅव्हल्स या व्यवसायामुळे पठाण कुटुंब कोल्हापूर व आजरा परिसरात परिचित आहे.
मनमिळाऊ, हसतमुख आणि होतकरू युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, चुलते व आप्तस्वकीय असा परिवार आहे.
अंत्यविधी शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता
आजरा येथे होईल.
Link Marathi परिवाराकडून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

मुख्यसंपादक



