Homeघडामोडीकृषी दिनानिमित्त आजरा पंचायत समितीत शेतकऱ्यांचा गौरव; आधुनिक शेतीचा अंगीकार करण्याचे आवाहन

कृषी दिनानिमित्त आजरा पंचायत समितीत शेतकऱ्यांचा गौरव; आधुनिक शेतीचा अंगीकार करण्याचे आवाहन

आजरा (प्रतिनिधी) : पंचायत समिती आजरा व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम पंचायत समिती आजरा येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. जयश्री गाडे या होत्या.
यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, सहायक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषी अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, विस्तार अधिकारी पृथ्वीराज चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. फुले तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सहायक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी यांनी केले.
यावेळी तालुकास्तरीय भात, भुईमूग आणि नाचणी पीक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी, कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांमधील पुरस्कार विजेते शेतकरी, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या विविध योजनांतील लाभार्थी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजनांतील लाभार्थी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी, “आज सन्मानित करण्यात आलेले शेतकरी या सन्मानास खऱ्या अर्थाने पात्र आहेत,” असे सांगितले.


उपसभापती सौ. यशोदा पोवार यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची आजही आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात सभापती सौ. जयश्री गाडे यांनी शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि उत्पादनवाढीद्वारे आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनी शेतकरी गट स्थापन करून शेतीपूरक उद्योगांमध्ये स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती डेळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी मानले.

बातमी आणि जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा -: अमित गुरव 8421666667

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular