हा प्रवास माझा आहे . कालच या घटनेतून मी प्रवास केला म्हणून विचार केला ताजा ताजाच मांडावा , २ दिवसाच्या महत्वाच्या कामा निम्मित गावी जाणे झाले आनंदाची बाब म्हणजे जाताना ची महालक्ष्मी एक्सप्रेस ची तिकीट RAC असताना ही शेवटच्या क्षणाला तिकीट कन्फर्म होऊन एसी सीट मिळाली. खूप सुंदर प्रवास झाला. माझे महत्वाचे काम संपवून माझे लेखन विश्व प्रीती आणि प्रतीक च्या लेखनासाठी प्रकाशकांना भेटण्याची माझी धावपळ चालू होती. त्यात गावच्या बसेस चे वेळापत्रक माझ्यासाठी नवीन असल्याकारणाने वेळेचा नीटसा अंदाज बांधता आला नाही.
बाहेरगावी जाऊन येऊन घरी पोहोचताच पुन्हा मुंबई परतीची वाट धरावयाची होती. जातानाचे ही RAC तिकीट फायनली कन्फर्म झाली.
ही देखील आनंदाची बाब होती , अत्यंत कमी कालावधीत बऱ्याच व्यक्तीशी संवाद राहिला होता. तो सवांद साधत साधत वेळ कधी झाला कळलेच नाही. गडबडीत प्याक अप केले. आई वाहिनी ही लगबगीने माझ्या जेवणाची तयारी करू लागले. रात्री पावणे नऊ च्या ट्रेन चा वेळ आणि घरीच ७ वाजले असता आता मात्र धीर सुटत होता .
” वहिनी राहू देत ग वेळ झाला आहे मी बाहेर काहीतरी घेईन खायला ट्रेन सुटेल माझी ” असे माझे उद्गार तोंडातून बाहेर पडतच मी शेवटी ब्याग घेऊन तयार झाली .
” ताई झाले झाले म्हणत ” एकदाशी का त्यांनी डब्बे ब्यागेत ठेऊ केले अन माझ्या दादा सोबत वेळेत बस मिळवण्याचा प्रवास सुरु झाला. नशीब कधी कधी थोडक्या साठी चुकून जात अन तसेच माझ्या बाबतीत ही घडलं.
माझ्या समोरूनच कोल्हापूर बस निघून गेली . पुढच्या बस ची वाट पाहत १५ मिनिट गेले , आता मात्र घड्याळाचे काटे अन हृदयाची धडधड स्पष्ट जाणवत होती . इतक्यात बस आली प्यासेंजर चंढेपर्यंत आणि तिथून निघेपर्यंत पुन्हा वेळ झाला . एक एक मिनिट आता जड जात होता . बस सुरु झाली काही अंतरावर गेल्यावर हायवे वर एक अपघात झाला होता त्यामुळे गाड्या बऱ्याच वेळ तिथे थांबून होत्या. थोडी आशा होती ती ही कोमेज ताना दिसत होती.
आता अजूनच हृदयाचे ठोके चुकण्यास सुरु झाली होती. आयुष्यात वेळेचा सदुपयोग नीट करणारी मी आज मात्र माझा स्वतः वरच राग येत होता . मी अशी कशी हलगर्जीपणा करू शकते ही गोष्ट माझ्या मनात आता टोचू लागली होती. इतक्यात मी माझ्या स्टेशन च्या ओळखीच्या काकांना कॉल करून ट्रेन बद्दल आणि तिकीट बद्दल बऱ्याच माहिती काढल्या , पण त्यात इतक्या कमी वेळेत काही साध्य होत नव्हतं.
धीर करून कंडेक्टर ला विचारलच “काका पावणे नऊ च्या आत ही बस पोहोचेल का ” ?
“नाही रे बाळ मला नाही वाटत पोहोचणार” म्हणताच समोर अंधार दिसत होता .रात्रीची वेळ माझी ६ वर्षाची मुलगी , ट्रेन तर आता काही केल्या भेटणार नव्हतीच ” कंडेक्टर शी संवाद साधत असताना समोरच्या दादांनी बरेच पर्याय दिले इथून मिरज ला जा , किंव्हा ही गाडी ही मुंबई ला जाते वगैरे पण माझं मन अनेक प्रश्नांनी वेढलं होत.
इतक्यात मी माझ्या भावाला सुनील ला कॉल केला जो कोल्हापुरात च राहत होता , तो कामावर असल्याकारणाने ट्रेन पर्यंत सोडणं त्यांला ही जमणार नव्हतं कारण घड्याळात वाजलेच साडे आठ होते , पर्याय खूप होते पण रात्रीचा प्रवास होता त्यामुळे काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेणे गरजेचे होते. भाऊ म्हणाला उद्या जा , मी थोड्यावेळात तुला घेण्यास बस स्टॉप वर येतो . पण प्रॉब्लेम हा होता मुलीची अगोदरच एक्सटेन्ड करून घेतलेली परीक्षा काही ही करून उद्या देणे गरजेची होती. शिक्षकाना मी दिलेला शब्द मोडण्यात कुठेही योग्य वाटत नव्हतं .
आता जमेल तितके प्रयत्न मला करावयाचे होते.
मी बस मध्ये बसली होती ती ही मुंबई ला जाणार होती , पण ती मुंबई त दुसऱ्या ठिकाणी जाणार होती त्यात प्यासेंजर होते ते कन्नडी , प्रवासात काही गरज लागली तर मी कोणत्या भाषेत संवाद साधायचा हा ही एक प्रश्न.
शेवटी माझ्या तुषार नावाच्या मित्राला कॉल केला जो ट्रॅव्हल्स विभागात काम करतो. काही मिनिटांत चं त्याने एका ट्रॅव्हल्स मध्ये माझी सीट बुक केली . समोर च्या ट्रॅव्हल्स च्या व्यक्ती ने कॉल केला एका गाव कमानी च्या ठिकाणी उतरण्यास सांगितले . पण ते कंडेक्टर काही केल्या तिथे गाडी थांबवण्यास तयार नव्हते. काही वेळा पासून बस मध्ये एक अनोळखी जे बंधु माझी मदत करत होते ते रागा सर्शी च उठले अन त्यांना रागाने म्हणाले
” रात्रीचा वेळ आहे एक स्त्री मुलीला घेऊन प्रवास करत आहे तिची ट्रेन मिस झाली तुमचा नियम माणुसकी साठी हि मोडू शकत नाही का , तुमची मुलगी असती तर थांबवला असता ना बस तेंव्हा नियम नाही लागू होत ? ” शेवटी बस थांबली.
एक अनोळखी व्यक्ती माझ्या साठी त्यांच्याशी वाद घालण्यात व्यस्त होती हे पाहून माझ्या डोळ्यातून एक थेम्ब पाण्याचा तरळून गेला.
शेवटी मी उतरली कंडेक्टर चे मन परिवर्तन कसे झाले समजले नाही पण गाडी थांबवून म्हणाले ” नीट जा हा बाळ , आणि हात केला “
तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर अगणित आनंद मावत नव्हता. सुनील कामावरून निघू शकत नव्हता पण त्याने माझा दुसरा मित्र विनय जो त्याच्या कामावर एकत्र काम करत होता त्याला मी ज्या गावी उतरले तिथे पाठवले होते तो ऑन द वे च होता.
या पूर्ण कालावधीत माझी मुलगी मात्र निढर राहिली . इतक्या गोंगाटा त ही ती शांत राहिली, ही माझ्या साठी खूप मोलाची गोष्ट होती.
तिच्या स्वरात ती म्हणाली ” काय झालं मम्मी आपली ट्रेन चुकली का ? मग आपण कश्याने जाणार आता ?
मी तिच्या डोक्यावर हात फिरवत इतकंच उत्तर दिल ” ट्रॅव्हल्स ने “
” ओके ” म्हणत त्या निरागस चेहऱ्याने एक स्मित हास्य दिले.
काही क्षण जातात अचानक मला ठसका लागला देव जाणे काय घडलं पण काही केल्या थांबेना शेवटी बाजूच्या मेडिकल मध्ये काम करत असलेल्या एक दिंदिने माझी पाठ थोपटली पाणी देऊ केलं . तिच्याच मेडिकल मधून स्ट्रॅप्सील प्याकेट फोडून मला देऊ केलं , काही वेळ जाताच मी शांत झाले .
” कसे वाटत आहे आता” म्हणत त्या दिंदिने पुन्हा विचारणं केलं अन ते स्ट्रॅपेंसिल प्याकेट च मला देऊ केलं अन म्हणाली “पुन्हा वाटेत असं काही झाले तर गरज पडेल ठेव तुझ्याजवळ “
” त्या दीदींचे खूप खूप आभारी मानत होतेच कि तोवर विनय तिथे हजर झाला, त्याच्या शी संवाद साधत साधत तच ट्रॅव्हल्स आली त्याने ब्याग ट्रॅव्हल्स मध्ये चढवली तोवर मी पळत मेडिकल मध्ये गेले ” दीदी कॅडबरी दे ना ” म्हणाले
३० रुपये काउंटर वर सरकवले अन दीदिने कॅडबरी दिली ” ती कॅडबरी तिच्या हातात प्रेमाने देऊ केली अन एक नजर आमच्या दोघीतील प्रेमाची त्या क्षणात खूप च मोठी जाणवली . “
तिला बाय करत मी ट्रॅव्हल्स मध्ये बसली . विंडो बाहेरून विनय म्हणतच होता ” सांभाळून जा , काही प्रॉब्लेम असल्यास कॉल कर , आणि पोहोचली स कि कळव .”
” हो S हो S रे म्हणत मी त्याचा निरोप घेतला.
मुंबई परती चा प्रवास सुरु झाला. विंडो सीट भेटल्यामुळे हवेने थापटावे तशी माझी मुलगी झोपी गेली . गेल्या एक तासात घडत असलेला माझा प्रयत्न अखेरीस यशस्वी ठरला. माझ्या गावचे ओळखीचे असल्यामुळे एक वेगळाच भास होता. काही वेळ डोळे मिटले गेले.
डोळ्यासमोरून जात होते ते दादा जे माझ्यासाठी कंडेक्टर ला समजावून सांगत होते , तुषार ने वेळ न दवडता ट्रॅव्हल्स सीट बुक केली.
सुनील जो विनय आणि स्वतः चे काम करत कामावर रुजू राहून विनय ला माझ्या मदतीसाठी पाठवलं. ते कंडेक्टर जे जाताना नीट जा म्हणून सांगू पाहत होते . ती दीदी जी माझी तब्बेत बिघडली असताना मला मदत केली. आणि विनय जो लगबगीने माझ्यासाठी वेळेत त्या गावी हजर झाला होता , या सर्वा च्या रूपात मला विठ्ठल भेटले होते.
पंढरीत राहतात पण आपल्यासाठी लगेच धावून येतात. ट्रेन चुकली आता त्या गोष्टीची खंत राहिली नव्हती आज माझ्या विधी लिखित मध्ये हि देव माणसं लाभणं लिहिलं होत . या गोष्टीतून खूप काही शिकण्यास मिळालं आत्मसात करण्यास मिळालं. मेल प्रवास करणे माझं स्वप्न असत आज जरी ते अपूर्ण राहील होत पण त्याहूनही मोठी गोष्ट आज मला या सर्वांचा सहवास भेटणं होत , संकटात धावून येणारी मैत्री पाहायला मिळाली . अनोळखी असून ही काही माणसं मनात घर करून गेली.
प्रवास सुखाचा चालू होता काही वेळात ट्रॅव्हल्स चे दादा म्हणाले तुमच्या बाजूच्या सीट वर असलेली व्यक्ती ही येणार नाही त्यामुळे २ सीट वर तुम्ही आरामात बसू शकता. म्हणजे अजूनही विठ्ठल वेगवेगळ्या रूपात भेटतच होते. मेल मुंबई त पोहोचण्याआधी ट्रॅव्हल्स पोहोचली आणि मी वेळेत घरी हजर झाली एकंदरीत माझ्या मुलीला परीक्षेला घेऊन जाण्यास मी यश्स्वी ठरली. कधी कधी काही काही आपल असते तरीही आपल्या हातून निसटून जात पण देवाने त्याहून ही सुंदर काहीतरी लिहिलं असत हे मात्र नक्की. कसा होता प्रवास नक्की कळवा .
धन्यवाद
रुपाली शिंदे
आजरा
मुख्यसंपादक
खूप छान
THANK U DADUS
निपाणी ते मुंबई
प्रवास
धुमकेतू सारखा
अनेक सुखद अनुभव
परिवारातील सर्वच नाती
आणि मंद, आईसारखा थोपटून झोपवणारा
सुखद गारवा
thank so much kaka
Khup Sundar 👌
Khup chan dear ….
tu ashich chan lihit raha
waiting your next articale
thank u so much dear
रूपाली अप्रतिम लेख👌👌