तरुणाई बेरोजगारीने त्रस्त आहे
गाडी आहे दारात पण पेट्रोलचे दर रोज वाढत आहे
हॉस्पिटलचे बिल दिवसेंदिवस वाढत आहे
मृत्युदरापेक्षा जन्मदर उच्चांक गाठत आहे
खायचं तरी काय भाजीपाल्याचे वाढते भाव आणि गरिबांचे मात्र हाल होत आहे
शिकून शिकून पदव्या घेतल्या जात आहे
तरीही आजची तरुणाई नोकरीशिवाय बेरोजगार आहे
जिवनाश्यक गोष्टीचे मोल गगनाला भिडत आहे
उपासमारीने कित्येकाचे बळी जात आहे
आज ची तरुणाई व्यसनाधीन होत आहे
भविष्यासाठी त्याची सगळी धडपड चालली आहे
जगून तरी काय कराव या विचाराने मनोरुग्ण होत आहे
कल याचा आता चूकीच्या मार्गाने मिळणार्या पैशाच्या मागे वाढला आहे
जगण्यातला रसच जणू काही यांचा उडला आहे
जो तो पैसाच्या मागे धावत आहे
नोकरीच्या नावाखाली गंडवण्याचे काम चालू आहे
कुठे मुलगी असून आपला वंश वाढावा म्हणून मुलाचा अट्टाहास आहे,
तर श्रीमंतांना फक्त एक लेकरु हवा आहे
म्हणून तर देश आपला बेरोजगारीने त्रस्त आहे…
✍️कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा