आजरा (अमित गुरव) – सुतार गल्ली आजरा येथे राहणारा हर्षद एकनाथ सुतार ( वय २३ ) याचा अपघातात काल मृत्यू झाला.
अडकुर वरून मित्रांना सोडून येताना हा अपघात झाला; त्यावेळी गाडीत तो एकटाच होता. शिक्षण घेऊन घरची जबाबदारी पार पाडत हलाखीची परिस्थिती सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न थांबला . दिवसभर एका सर्व्हिसिंग सेंटर मद्ये काम करून सायंकाळी चहाचा गाडा चालवत कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करी.
त्यांच्या मागे आई वडील आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.