गडहिंग्लज (प्रतिनिधी)
डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स असो आणि रोटरी क्लब गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. किशोर घेवडे यांनी दिली. शनिवारी सकाळी दहा वाजता डॉक्टर कॉलनी येथील घेवडे नेत्र रुग्णालयात शिबिराचे उद्घाटन होऊन तपासणी करण्यात येईल.
यावेळी बोलताना डॉ. घेवडे म्हणाले, "पत्रकार हा समाजातील सर्वात उपेक्षित घटक आहे. जो स्वतःच्या किंवा कुटुंबाचा विचार न करता फक्त समाजासाठी झगडत असतो. अशा दुर्लक्षित घटकासाठी काम करण्याची संधी मिळावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार बांधव, त्यांचे सहकारी आणि कुटुंबीयांनी याचा लाभ घ्यावा."
इच्छुक सदस्यांनी इव्हेंट चेअरमन अभिजीत मांगले (97667 84500) व सचिन घुगरी (99210 51112) यांचेकडे नाव नोंदणी करावी. नोंदणीसाठी उपस्थित राहणाऱ्या सदस्यांचे नाव आणि वय संबंधित नंबरवर व्हॉटस अप करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष आणि डिजिटल मिडीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले, सचिव धनाजी कल्याणकर, बाळ पोटे पाटील, डिजिटलचे तालुकाध्यक्ष नितीन मोरे, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्सचे रविंद्र हिडदुगी, शिवकुमार सन्सुद्धी, अभिजीत मांगले, धनंजय शेटके, अमित कांबळे आणि वृत्तपत्र संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश खोत उपस्थित होते.

मुख्यसंपादक