आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2025-26चा 27वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज बुधवार दि. 15/10/2025 रोजी सकाळी 11:00 वा.कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन सुभाष देसाई व सर्व संचालक मंडळ यांचे हस्ते संपन्न झाला.
https://youtu.be/mHaPYUMpJ70?si=y3VIDhHI8EwJnzIv
...
आजरा(हसन तकीलदार):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)गटाचा बुरुडे ता. आजरा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनी एकत्रित येऊन एक दिलाने काम करूया असेही सांगण्यात आले. ...
आजरा(हसन तकीलदार):-भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची केलेली कृती तसेच सोनम वांगचूक या अभियंता, शास्त्रज्ञ आणि लडाख मधील सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे संस्थापक यांना केलेली अटक या घटना निषेधार्थ असून सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून तातडीने अटक करावी आणि सोनम वांगचूक यांना केलेली अटक ही चुकीची असून त्यांची तात्काळ सुटका करावी अशा...
घडामोडी
Varinder Singh Ghuman : भारताचा शाकाहारी बॉडीबिल्डिंग ध्यासपती मृत्यूमुखी , हृदयविकाराचा झटका कारणीभूत
अमित गुरव
अमृतसर ( प्रतिनिधी ) -:
भारतातील प्रसिद्ध पंजाबी बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुमन (Varinder Singh Ghuman) यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
घुमन हे काही दिवसांपूर्वी खांद्याच्या दुखण्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया (operation) केली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर...
कला-क्रीडा
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा कसोटी सामना: दिल्लीत भारतीय फलंदाजांची सुरुवात, पण राहुलची विकेट गेली
अमित गुरव
दिल्ली - आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस सुरू आहे. मी, डॉ. रवींद्र पाटील, गेल्या तीन दशकांपासून क्रिकेटच्या जगात फिरतोय आणि अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार झालोय. पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना भारतासाठी मालिका २-० ने जिंकण्याची...
आजरा(हसन तकीलदार):-आपल्या विविध मागण्यासाठी तिन्ही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने संपाचे हत्यार उपसले आहे. दि. 29 सप्टेंबर 2025 पासून टप्प्या टप्प्याने अधिकारी व विजकर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सरकारी मालकीच्या तिन्ही वीज कंपन्याकडून कामगार विरोधी धोरणांची एकतर्फी अंमलबजावणी होत असल्याने तसेच महत्वाच्या व धोरणात्मक बाबींमध्ये कामगार संघटनांच्या मागण्या व हरकतींचा समावेश न करता घाईत व एकतर्फी लादलेले निर्णय कामगारांचे आयुष्य...
घडामोडी
नुकसानग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या -शिवसेना उबाठाचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार) :-यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50हजार इतकी थेट आर्थिक मदत जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना...
आजरा(हसन तकीलदार):-संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिलेले आजरा नगरपंचायत आगामी सर्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत अखेर आज जाहीर करण्यात आली. आजरा-भुदरगचे प्रांताधिकारी हरीश सूळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आले. या अगोदरच नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये प्रत्येकजण आता इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे. अजून भरपूर घडामोडी होणे...
घडामोडी
तिन्ही वीज कंपन्यातील वीज कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी टप्प्या टप्प्याने दीर्घ आंदोलनाचे निवेदन
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-सरकारी मालकीच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्याकडून कामगार विरोधी धोरणांची एकतर्फी अंमलबजावणी होत असल्याने तसेच महत्वाच्या व धोरणात्मक बाबींमध्ये कामगार संघटनांच्या मागण्या, सूचना व हरकतींचा समावेश न करता घाईत व एकतर्फी लादलेले निर्णय कामगारांचे आयुष्य व वीज कंपन्याच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम करणारे ठरू शकतात. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीत रिस्ट्रक्चरिंग लागू करण्याची घाई केली जात आहे....
आजरा (हसन तकीलदार) :महाराष्ट्र राज्य शासनाच्या जुलै 2025 मधील सुधारित अनुकंपा धोरणामुळे गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यातून मिळालेल्या या अमूल्य संधीचा पूर्णपणे सदुपयोग करा आणि लोकाभिमुख कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडा, असे आवाहन शासकीय सेवेतील नवनियुक्त अनुकंपा व सरळ सेवा उमेदवारांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या...









