Home Blog Page 13
आजरा ( प्रतिनिधी ) - दिपावलीच्या मंगलमय वातावरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे विभाग (आजरा) तर्फे आनंद, ऐक्य आणि आपुलकीचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. या प्रसंगी धनगर समाजातील बांधवांसाठी विशेष फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता — समाजातील एकोपा वाढवणे, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे,...
आजरा ( प्रतिनिधी ) :-हिरण्यकेशी नदी काठावर असलेला रामतीर्थ धबधबा आजरा शहरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात या धबधब्याला बहर येतो आणि ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यात धबधब्याचे दृश्य मनाला मोहून टाकते. आता तर हिरण्यकेशीच्या वरच्या बाजूला प्रकल्प झाले असल्याने हा धबधबा अखंड प्रवाहीत असतो. वेंगुर्ला, सावंतवाडी येथून कोल्हापूर, पुण्याला जाण्यासाठी बसेस आंबोली घाटमार्गे आजऱ्यावरून जातात. रामतीर्थ परिसराचे विलोभनीय,...
Asrani यांचे जीवन-परिचय | बायोग्राफी १. प्रारंभिक जीवन Govardhan Asrani (ज्यांना ‘असराणी’ म्हणून ओळखले जाते) यांचा जन्म दिनांक १ जानेवारी १९४१ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला.मध्यमवर्गीय सिन्धी हिंदू घराण्यातील ते. पोर्टफोलिओ व्यवसायाचे वडील होते; असराणी लहानपणीच चित्रपट अभिनेते होण्याची आवड ठेवत होते. २. शिक्षण व सुरुवात – जयपूरमधील St. Xaviers स्कूलमध्ये शिकले आणि पुढे राजस्थान कॉलेजमधून पदवी पूर्ण केली.– अभ्यासासाठी आणि जगण्यासाठी त्यांनी...
आजरा(हसन तकीलदार):-मृत्युंजय ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे अत्यावश्यक लसींच्या कमतरतेबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीकडून डॉ. सुश्रृत जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी डॉ. जमदाडे यांनी सदर प्रकरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, कु. प्रथमेश बयाजी कोकरे रा. आवंडी धनगरवाडा याला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णास ए. आर. व्ही. लस...
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या 27 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि. 24/10/2025 रोजी सकाळी ठीक 11:00 वा नाम. हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री) यांचे हस्ते व नाम. प्रकाश आबिटकर (पालक मंत्री कोल्हापूर जिल्हा )यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. ...
आजरा (हसन तकीलदार ):- भारतीय जनता पार्टी आजरा कार्यकारणीच्या पद वाटपासाठी उपस्थित श्री. शिवाजीराव (भाऊ) पाटील यांच्या हस्ते कार्यकारणीची पदे वाटप करण्यात आली. यामध्ये आजरा शहराध्यक्ष पदी आकाश रावसाहेब पाटील व महिला शहराध्यक्ष पदी माधवी पाचवडेकर यांना निवडीचे पत्र देण्यात आली. याचबरोबर इतर कमिट्यांचे देखील पदे शिवाजीराव पाटील व भाजपा आजरा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी आमदार...
भादवण ( अमित गुरव ) :भादवण गावचे ज्येष्ठ नागरिक कै. मारुती दत्तू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते भादवण गावचे माजी सरपंच श्री. संजय मारुती पाटील यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भादवण ग्रामस्थांनी या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त केला आहे. कै. मारुती पाटील हे आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे गावातील सर्वांच्या प्रेमास पात्र ठरले...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तसतसे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढतच चालली आहे. आरक्षणामुळे ज्यांची अडचण झाली आहे असे उमेदवार दुसऱ्या वॉर्डात आपले बास्तान बसवायचे सुरु केले आहे. यासाठी आपल्या नातेवाईकांची, अप्तेष्टांची आणि हुकमी मते घेऊन आपल्या सोयीच्या वॉर्डात त्या मतदारांची खोटे पुरावे सादर करून वेगळ्या वॉर्डात मतदार नोंदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी खोटे पुरावे...
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम 24 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु होणार असून तालुक्याच्या इतर गावापासून येणारे रस्ते अतिपावसामुळे पूर्णपणे उखडून खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सदर रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी असे निवेदन आजरा साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. https://youtu.be/mHaPYUMpJ70?si=bxJQiAFJd9ixHJso यावर्षी साधारणपणे मे मध्यापासून पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले...
आजरा(हसन तकीलदार):-आपल्या विविध मागण्यासाठी तसेच हत्तीच्या वास्तव्याला कंटाळून घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे, आंबाडे या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलन सुरु केले होते. पहिल्यांदा चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सहाय्य्क वनसंरक्षक विलास काळे यांनी आंदोलकांच्या स्थानिक व आपल्या अख्त्यारितील काही मागण्या पूर्ण करण्याची हमी देऊन अन्य धोरणात्मक मागण्याबाबत वरीष्ठाशी बैठक लावून मार्ग काढण्याची लेखी हमी दिल्यानंतर तसेच...