Home Blog Page 15
आजरा (हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि ;अमृतनगर गवसे तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसपिक उत्पादन व सरासरी एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शुक्रवार दि. 10/10/2025 रोजी सकाळी 11:00वाजता जनता सहकारी बँक लि;आजराच्या हॉल मध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.आजरा साखर कारखान्याच्या ऊस विकास...
आजरा (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मुथूट फिनकॉर्प शाखेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. शाखेच्या कर्मचाऱ्यांसह ग्राहकांच्या संगनमताने खऱ्या सोन्याच्या जागी बनावट दागिने ठेवून २१ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ८ संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. ही घटना सोन्याच्या कर्ज व्यवहारातील भ्रष्टाचाराची बाब उघड करत आहे. फसवणुकीचा प्रकार काय? माहितीनुसार, ग्राहक जीवन...
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२५ (विशेष प्रतिनिधी): विजयादशमीच्या पवित्र दिवशी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (शिवतीर्थ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा पारंपरिक दसरा मेळावा पार पडला. पावसाच्या सरी आणि चिखलाच्या साम्राज्य असूनही शिवसैनिकांनी मैदान भरून टाकले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसात भिजत सुमारे ४५ मिनिटांचे धडाकेबाज भाषण केले, ज्यात महाविकास आघाडी-मनसे युतीची पुष्टी, शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी आणि सरकारला आंदोलनाची...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा येथील राहत खिदमत फाउंडेशनतर्फे स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियान दि. 17सप्टेंबर ते 02ऑक्टोबर सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण मोहीम, आभा कार्ड बनवणे तसेच आयुष्यमान भारत कार्ड बनवणे अशा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासिन सैय्यद (सर)यांनी केले.यावेळी सर्वप्रथम मौलाना लियाकत तगारे यांनी कुरान आयत...
आजरा (प्रतिनिधी ):-आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून आज (मंगळवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील 150 हून अधिक माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही देण्यात आला. खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले. अनिकेत मंगल कार्यालय, महागाव, गडहिंग्लज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानावरून बोलताना, खासदार शाहू महाराज म्हणाले, आज...
आजरा (हसन तकीलदार):-आजरा सावरवाडी येथील शहीद अब्दुल हमीद वि. का. स.सेवा संस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक युसूफ भडगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ताळेबंद, नफातोटा पत्रक तसेच इतिवृत्तांतचे वाचन संस्थेचे सचिव रजनीकांत कुंभार यांनी केले.या सभेमध्ये विविध विषयावर सांगोपांग चर्चा झाली. प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन अबूताहेर तकीलदार म्हणाले की,...
पुणे -: येथील सिहंगड लॉ कॉलेज (Sinhgad Law College) मध्ये महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET Law) मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी दिव्या सुनिल शिंदे (Divya Sunil Shinde) यांचा तीन वर्षांच्या एलएलबी (3-Year LL.B.) अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही घटना शैक्षणिक व्यवस्थेतील भ्रष्टाचार, आरक्षण प्रक्रियेवरील अडथळे आणि जातीय भेदभावाच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. दिव्या शिंदे यांनी एक व्हिडिओ जारी...
आजरा (हसन तकीलदार):-राज्य शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत आजरा नगरपंचायत क्षेत्रात “नमो उद्यान” उभारण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील रहिवाशांना आधुनिक व आकर्षक उद्यानाचा लाभ मिळणार असून हरित परिसर आणि दर्जेदार विरंगुळ्याच्या सोयी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे सांगितले आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना उत्कृष्ट दर्जाचे उद्यान विकसित करण्यासाठी...
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि;अमृतनगर गवसे च्या दि. 25/09/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून कारखाना व्यवस्थापनाने कारखाना कार्यस्थळावर प्रथमच "कृषी महोत्सव"या अभिनव सदराखाली "कृषी उपयुक्त साहित्य प्रदर्शन"आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबवला. या उपक्रमाचे शेतकरी, सभासद वर्गातून कौतुक होताना दिसत आहे. आजरा तालुक्यात विविध पाणी प्रकल्प पूर्ण झाली आहेत. उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये...
आजरा (हसन तकीलदार) :श्री.कामवीर विविध कार्यकारी विकास सेवा संस्था मर्यादित, चांदेवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठल-रुखमाई मंदिरातील अमृतराव देसाई सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला वार्षिक अहवाल कालावधीत निधन पावलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता १०वी, १२वी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा ठराव लक्ष्मण सावंत यांनी मांडला. सचिव जयवंत येसादे...