Home Blog Page 252
बंदुकीच्या धाकानेसत्तेवर तालिबानस्वातंत्र्य हिरावलेगुलाम झाले अफगान नरकयातना स्त्रियांनालोक सैरावैरा पळतीबंदुकीच्या धाकानेसाऱ्या देशाला छळती. मानवतेचा घोटूनी गळाधर्मांध येती सत्तेवरकुठे गेले मानवतावादीकसे बोलेना अफगानवर देश सोडून जाऊ म्हणणारेत्यांचे ते शब्द आठवातालिबान्यांचा नंगानाच पाहण्याया बोलघेवड्यांना पाठवा आज कळले साऱ्यांनाकिती महान हिंदुस्तानधर्म नांदती सुखानेतिरंगा आण-बाण शान स्वातंत्र्य चिरायू ठेवूयाजपूया माणुसकीची नातीवंदन करतो भारतमातेलापवित्र आहे इथली माती… कवी -किसन आटोळे सरवाहिरा ता आष्टी
"पैसा कमवा, आरामात राहा, आपला व्यवसाय भला की आपण असा मर्यादित विचार करू नका. आपण सार्वजनिक जीवनात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. काही चांगले काम केले पाहिजे आणि आपला अनुभव इतरांनाही कथन केला पाहिजे. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल"! असा सल्ला आपल्या भारताचे सरन्यायाधीश मा. एन. व्ही. रमण यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात रविवार,...
लोकशाही असली तरी जवळ मुबलक पैसा, आरे ला कारे म्हणत समोरच्याला दणके देऊन गप्प बसवण्याची ताकद व बोलण्याची छाप पाडून लोकांना मतांसाठी एकत्र जमवण्याची खुबी या तीन गोष्टी जवळ नसतील तर केवळ उच्च शिक्षणाच्या भांडवलावर राजकारणात पडणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय. शिक्षण हे वाघीणीचे दूध, ते पिल्यावर माणूस गुरगुरणारच! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य सुशिक्षित मनाला...
आजरा (अमित गुरव ) - आपल्या धामणे गावातील तरुण पिठेचे आदर्श व गावाला ज्यांचा अभिमान वाटतो अश्या सर्व आजी- माजी जवानांचे नाव व शक्य असेल तर फोटो ग्रामपंचात कार्यालयात फलकावर लावावेत अश्या मागणीचे निवेदन अंबाजी गुरव यांनी सरपंच शिवाजी लोकरे यांच्या कडे दिले .निवेदनात जवान सीमेवर अहोरात्र पहारा देतात त्यांचा त्याग व बलिदानासाठी त्यांना दिमाखात ग्रामपंचायत फलकावर नावे देण्याची...
देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ चढकर सहभाग नोंदवते.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1920 नंतर ही प्रक्रिया सुरु झाली. म. गांधीजी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या अन्य नेत्यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आणि त्या संवादातून जनतेला एक शब्द मिळाला. तुम्ही शेतकरी असाल, भूमीहीन शेतमजूर असाल, कामगार असाल, आदिवासी असाल, किंवा महिला...
मारावी फुंकर / तुम्ही हळुवार/उतरेल भार / या जीवाचा //१// झाली बघा दैना / दुःखाचा डोंगर /कोरोना कहर / किती सांगू //२// धो धो कोसळला / आला महापूर /नष्ट घरदार / मेले किती //३// जन्म मनुष्याचा / संकट हे फार /प्रेमाची फुंकर / तारी जीवा //४// एकदाच जन्म / नको हेवादेवा /आधार तो द्यावा / एकमेका //५// धावूनिया जावे / फुंकर घालावी /मदत करावी...
१६ ऑगस्ट इ.स.१६६६छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे.औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर...
📜 १६ ऑगस्ट इ.स.१२७५दि.१६ आॅगस्ट इ.स.१२७५ रोजी मराठी भाषेतील श्रेष्ठ तत्वज्ञ आणि प्रतिभावंत कवी श्री. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व...
एखाद्या स्त्रीला अमिताभ बच्चन नवरा असावा असे वाटत राहील तर एखाद्या पुरूषाला हेमा मालिनी बायको असावी असे वाटत राहील पण शेवटी वाट्याला आलेल्या जोडीदाराबरोबर संसार करावा लागेल, इच्छेचे काही खरं नाही. एखाद्या गायक, गायिकेला चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक, पार्श्वगायिका म्हणून पुढे यावे असे वाटत राहील पण शेवटपर्यंत अॉर्केस्ट्रातच गायक, गायिका म्हणून काम करावे लागेल, इच्छेचे काही खरं नाही. एखाद्या क्रिकेट खेळाडूस सचिन...
मूलभूत वासनांसोबत चांगल्या व वाईट अशा भावना (वृत्ती) निसर्गानेच मनुष्याला दिल्या आहेत. या भावना (वृत्ती) मनुष्याच्या स्वतःच्या नाहीत तर त्या निसर्गाकडूनच मनुष्याला प्राप्त झाल्या आहेत. मूलभूत वासनांचे समाधान हे चांगल्या भावनांच्या संगतीत करायचे की वाईट भावनांच्या संगतीत करायचे हे निवड स्वातंत्र्य निसर्गाने मानवी बुद्धीला दिले आहे. या बुद्धीला लहानपणापासून जशी संगत लाभेल तसा माणूस घडत जातो. चांगल्या संगतीत सद्गुणी...