आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यातील आरदाळ येथील 80वर्षाचे वृद्ध गंगाराम कांबळे यांना घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली आहे. कोणतेही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे ते एका पडक्या घरात रहात आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून या वृद्धाची मदत करावी असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले...
आजरा (हसन तकीलदार ):-बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव गावातील एका बौद्ध तरुणास जात आणि धर्म विचारून निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या लोकांवर ऍट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई होणेबाबतचे निवेदन आजरा तालुका रिपब्लिकन सेनेतर्फे आजरा तहसीलदार समीर माने आणि आजरा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
...
आजरा (हसन तकीलदार ):-राज्यात पुकारलेल्या जनावरे व्यापाऱ्यांच्या बंदला आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने जनवरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत येणाऱ्या काळात जनावरांचे व्यापारी जनवरांचा व्यापार पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचे बैठकीत घोषित करण्यात आले त्याचप्रमाणे लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघटित होऊन संघटना तयार करून सनदशीरपणे लढा देण्याचे ठरले.आजरा तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील...
आजरा (हसन तकीलदार ):-देशात सोन्याने लाखाचा टप्पा गाठल्यामुळे सर्वसामान्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत तर सर्वसामान्य जनतेला लग्नात अडचणी येत आहेत. दागिने खरेदी करताना नाकीनऊ होत आहे. गरीब लोक सोने हे एक महत्वाचे बचत आणि गुंतवणुकीचे साधन मानतात. सोन्याने लाखाची पायरी ओलांडल्यामुळे गोर गरिबांना लग्न सराईत दागिने करताना खूप अडचण निर्माण होत आहे.
सोन्याचे भाव वधारणे म्हणजे भयंकर मंदीचे लक्षण...
आजरा (हसन तकीलदार ):-संकेश्वर -बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळील टोलनाक्यामुळे आजरावासियांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार असलेने हा टोलनाका तालुक्याच्या टोकाला हलवा किंवा आजरेवासियांना टोलमधून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना आजरा सरपंच परिषदेने दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर-...
आजरा ( अमित गुरव ) –"सध्याच्या बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रक्रिया केवळ शिक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नसून त्यात पालकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे," असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी व्यक्त केले.
विद्या मंदिर रायवाडा येथे पार पडलेल्या पालक मेळाव्यात ‘अभ्यास प्रक्रियेत पालकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन...
आजरा (हसन तकीलदार ):-मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान 2025अंतर्गत आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालय आजरा व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांचेमार्फत आजरा तालुक्यातील इटे येथील सागर पाटील यांची चिमुकली कन्या अनुश्री पाटील हिची हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकीलाबेन हॉस्पिटमध्ये मोफत करण्यात आली.
आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालयचे तपासणी पथक इटे येथील अंगणवाडीत मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी अनुश्रीच्या...
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यामध्ये विविध जाती, पंथाची आणि धर्माची लोक व्यापारी व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत आजरा शहरातील व्यापाऱ्यांना एकत्रित येऊन संघटना बळकट करून भेडसावत असलेले अनेक प्रश्न सोडविणे काळाची गरज बनली आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात असतानासुद्धा आजरा शहरावर संवेदनाशिलतेचा शासनाचा बसलेला ठपका आजऱ्याच्या बाजारपेठेला मारक ठरत आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येत हा ठपका पुसून काढला पाहिजे अशी याठिकाणी...
शेत रस्ता मागणी अर्ज कसा करावा ?
📝 1. अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी:
अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर
ज्या शेतासाठी रस्ता हवा आहे त्या शेताचे गट नंबर, सर्व्हे नंबर, आणि हद्दीतील तपशील
रस्ता कोणत्या ठिकाणावरून हवा आहे, त्याची सविस्तर माहिती (सिमा नकाशा सोबत असेल तर उत्तम)
आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सह्या / संमतीपत्रे (प्राथमिक स्वरूपात)
शेताचा 7/12 उतारा (अधिकाराचे पुरावे)
📍 अर्ज सादर करण्याचे ठिकाण:
तलाठी → सरपंच/ग्रामसेवक...
आजरा (हसन तकीलदार ): -येथील एस. टी. स्टॅंड नजिक सोनेखान कॉम्प्लेक्स आपला बझारच्या वरील मजल्यावर हेल्थकेअर क्लिनिकल लॅबचे डॉ. इंद्रजित देसाई यांचे हस्ते नुकताच उदघाट्नचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
संपूर्ण स्वयंचलित संगणकीय लॅबोरेटरी असून याठिकाणी रक्त, लघवी, थुंकी, थायराईड व हार्मोन्स या सर्व प्रकारच्या तपसण्या अल्पदरात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. गौतम नाईक म्हणाले की, आजऱ्यात...










