घडामोडी
“Wagh Bakri चहा सम्राट ( उद्योजक ) पराग देसाई यांचा मृत्यू : भटक्या कुत्र्यांपासून पळताना डोक्याला गंभीर दुखापत !”
अमित गुरव
Parag Desai यांचे दुःखद निधन — घरी वॉकवर असताना पळताना पडून नुकसान; संगणक आणि समाजातील प्रतिक्रिया
Ahmedabad, 22 ऑक्टोबर 2023 — प्रतिष्ठित Wagh Bakri Tea Group चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय 49) यांचे दुःखद निधन झाले. ते 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते तेव्हा त्यांच्या घराजवळील भटक्या कुत्र्यांचा सामना करीत पळताना त्यांनी आपला बॅलन्स गमावला व पडले. यात...
घडामोडी
पवित्र प्रणाली टप्पा दोनच्या शिक्षक भरती अभियोग्यधारकांना न्याय द्या. कॉ. शिवाजी गुरव
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार): पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्यावर अन्याय झाला असून खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाल्याने अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा अशी मागणी कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
...
आजरा(हसन तकीलदार).. येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता दहावी अ वर्ग व वर्गशिक्षक एम.एम. एलगार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रिया अरविंद देशमुख ,सिमरन भिकाजी पाटील व अदिती अशोक नरके यांनी लोकमान्य टिळक...
चंदगड(हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील होसूर भागातील गावाना गेल्या अनेक वर्षापासून एस. टी. सेवा सुरु करणेसाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही चंदगड आगार गांधारीची भूमिका घेत डोळ्यावरची पट्टी काढायला तयार नाही. या अगोदरही बहुजन मुक्ती पार्टीने निवेदने दिली होती त्यावेळी 3 जुलै 2025 पर्यंत एस. टी. सेवा सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरीसुद्धा आजअखेर चंदगड आगाराने एस....
आजरा (हसन तकीलदार)*:-संकेश्वर -बांदा महामार्ग आजरा वासियांना सोयीचे कमी आणि डोकेदुखी मात्र जास्त असल्याचे जाणवत आहे. विविध पक्ष, संघटना एकत्र येत येथील टोलनाक्याला विरोध केला आहे. त्याचप्रमाणे आजरा येथे मोटर मालक व चालक यांची न्यू आजरा रोडलाईन्स सहकारी वाहतूक संस्था कार्यरत असून या संस्थेने आपल्या ट्रक मालक चालकांच्या अडचणी, सद्याची ट्रक वाल्यांची व्यवसायाची परिस्थिती,वाढते डिझेल दर, प्रत्येक गोष्टीला आकारले...
घडामोडी
सोमवारी १८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात महामोर्चा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):- शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. 18/08/2025 रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.
सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की, १२ जिल्ह्यातील...
घडामोडी
खंडित वीज पुरवठ्यामुळे नुकसान , वीज पुरवठा सुरळीत करा – काजू प्रक्रिया संघटनेचे वीज विभागाला निवेदन
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यात पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काजू बियांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊसपिकाबरोबर काजुलाही नगदी पीक म्हणून ओळख आहे तालुक्यात उत्पादन होत असल्यामुळे काजूबियावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योगही त्याच प्रमाणात आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेच्या लपंडावामुळे आणि सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे विजेच्या दाबामध्ये कमी जास्त प्रमाण होऊन उत्पादनात अडथळे येत...
आजरा (हसन तकीलदार):-सरपंच परिषद मुंबई तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून काम सुरु आहे.या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वणवा निर्मूलन मोहीम महत्वाची ठरली आहे. त्यालाच अनुसरून आता जंगल संवर्धनासाठी सरपंच परिषदेने गावगावच्या परिसरामध्ये देशी प्रजातीची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशी प्रजातीची 50रोपे प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचे धोरण सरपंच परिषदेने ठरविले असून संबंधित ग्रामपंचायतिनेही स्वतः 50रोपे घालून अशी...
घडामोडी
तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हापरिषद गण वाचवण्यासाठी शिंदे यांची धडपड कौतुकास्पद
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार) :-आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन गण कमी केल्याने सुनील शिंदे यांनी याबाबत हरकत दाखल केली आहे. त्याची सुनावणी व म्हणणे मांडण्यासाठी 5ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी कोणाकडे पुरावे तसेच अधिक माहिती असेल तर देण्यासाठी आवाहन केले आहे.
तालुक्याला तीन आमदार लाभलेत तरीसुद्धा तालुक्याला...
घडामोडी
आवंडी ते धनगरवाडा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवा -बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार):-विटे येथील चित्री धरणापासून ते धनगरवाडा क्र.1दरम्यान बनवलेल्या रस्त्याची रुंदी निर्धारित निकषापेक्षा कमी असल्याने त्याचप्रमाणे चित्रीप्रकल्पाकडे पर्यटकांची रहदारी असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. साधी दोन वाहनेसुद्धा जाऊ शकत नाहीत त्यामुळे कित्येकदा अपघात झालेले असल्याने सदर रस्त्याची रुंदी निर्धारित निकषाप्रमाणे वाढवून मिळावी याबाबतचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने शाखा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,...









