Home Blog Page 28
मुंबई(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामना वृत्तपत्रात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्‍यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोललं जात...
आजरा (हसन तकीलदार ):-यावर्षी साधारणपणे 12मे पासूनच पावसाने न थांबता संततधार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी तसेच खरीप पिके पेरण्यास संधीच मिळाली नाही. त्यामुळे भाताची तरवे, नाचण्याची ल्हवे,भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी पिके घेताना अडचण निर्माण झाली.त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना सरपंच परिषदेने दिले आहे. आजरा तालुक्यात भात, नाचणी, भुईमूग,...
आजरा (हसन तकीलदार):आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेले शेळप, दाभील, साळगाव आणि हाजगोळी गावांदरम्यानचे रस्ते हे कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या (KT) बंधाऱ्यांवरून जातात. पावसाळ्यात बंधाऱ्यांवर पाणी आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अनेकदा नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेता बंधाऱ्यांना समांतर पूल बांधावेत अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली असून आजरा तहसीलदार समीर माने यांना...
जाहिरातीचे प्रभावी 5 M हे कोणतीही जाहिरात यशस्वी करण्यासाठी वापरले जाणारे पाच महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक "5 M of Advertising" म्हणून ओळखले जातात. हे घटक म्हणजे: 🟩 1. Mission (ध्येय) अर्थ: जाहिरात कशासाठी करायची आहे, याचे उद्दिष्ट ठरवणे.उदाहरण: एखाद्या नवीन मोबाईल कंपनीने "ब्रँड ओळख निर्माण करणे" हे ध्येय ठेवले. 🟩 2. Money (बजेट / पैसा) अर्थ: जाहिरातीसाठी किती पैसा खर्च करायचा आहे,...
इस्लामपूर(हसन तकीलदार):-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक व उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांचे नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेचा जोरदार निषेध करत सन.1/04/2025ते मार्च 31मार्च 2026अखेरच्या वाढीव संकलित कराच्या बिलाची होळी करणेत आली. यावेळी वाढीव बिल रद्द करा, झोपेचं सोंग घेणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो, नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकुमशाही नहीं चलेगी , कचरा संकलन कर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणानी पालिका परीसर...
आजरा (हसन तकीलदार ):महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आजरा तर्फे रक्तदान शिबीर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 51जणांनी रक्तदान केले तर अण्णाभाऊ सहकारी सूत गिरणी खेडे येथे 1001वृक्ष रोपांचे रोपणाचा शुभारंभ करण्यात आला . भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. आजरा महाविद्यालय येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन...
आपली मदत आणि देणगी योग्य ठिकाणी देणे गरजेचे- रेहान तकीलदार(शिवसेना उबाठा वॉर्ड प्रमुख)आजरा (हसन तकीलदार ):-हुक्केरी तालुक्यातील मैसूरगप्पी गावातील 27वर्षीय तरुणी ब्रेनट्यूमरने ग्रस्त आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. ती मदत गोळा करण्यासाठी आजऱ्यात आलेल्या तिच्या वडिलांचे हृदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाले होते. त्यामुळे दर्गागल्लीतील काही युवकांनी पुढाकार घेत स्वतः आर्थिक मदत गोळा करून तिच्या गावी...
आजरा (हसन तकीलदार):-संकेश्वर बांदा महामार्ग आजऱ्याच्या जनतेसाठी सोयीचे कमी पण डोकेदुखी जास्त ठरले आहे. रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य होत नाही, पूर्वी इतकाच रस्ता, गटारिंची व्यवस्था चुकीची, महामार्गाचे कोणतेही निकष पूर्ण न करता आजरेकरावर टोलची टांगती तलवार मात्र कायम ठेवली आहे. यासाठी शिवसेना उबाठा तर्फे संकेश्वर बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळ बसवलेला टोल नाका तालुक्याबाहेर तरी न्या...
उत्तूरमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ – 50 मुलींना लस अमित गुरव ( उत्तूर ) -: आज, रविवार 20 जुलै 2025 रोजी, उत्तूर येथे नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा. वसंतराव धुरे, पंचायत...
गारगोटी (हसन तकीलदार) -: भुदरगड तालुक्यातील दोनवडे-नितवडे-खेडगे-एरंडपे येथील सात धबधबे सुशोभिकरण व विकसीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3 कोटी 44 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच...