मंगलाष्टक म्हणजे वधू-वरांसाठी घरातील ज्येष्ठांनी आशीर्वादरूपी गायलेली आठ कडवी असतात. त्याच्या माध्यमातून उभयतांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने ही प्रार्थना लग्नाच्या मुहूर्तावर गायली जाते.
हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह...
संस्कार म्हणजे सदाचरण. मानवी जीवनातील कर्म ज्याला नैतिकतेची जोड आहे. संस्कार हा कर्माचा एक असा भाग आहे जो संस्कृती मधून जन्माला येतो. संस्कृती टिकली तर संस्कार टिकतात आणि संस्कारी कर्मातूनच संस्कृती जन्माला येते. हिंदु धर्मात संस्कृती आणि संस्कार या दोन्ही गोष्टीना खूप महत्व आहे. आणि हि हिंदु संस्कृती टिकून राहावी म्हणून आपल्या पूर्व ऋषीमुनींनी प्रत्येक मानवी जीवाला संस्काराने जोडून...
'वारी' हा शब्द कानी पडताच आठवण येते ती पंढरपूरला होणाऱ्या आषाढीवारीच्या सोहळ्याची. महाराष्ट्रातून आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, सासवड, एदलाबाद, पैठण, शेगाव इ. प्रसिद्ध संतांच्या गावांहून त्यांच्या पालख्या आषाढी एकादशीस पंढरपूरला जाण्यास हजारो भक्तांसह प्रस्थान ठेवतात. सर्वजण श्रीविठ्ठलाचे दर्शनासाठी भूवैकुंठ पंढरपूरला निघतात ते हरिनाम घोष करत. ऊन, वारा, वादळ, पाऊस कशाचीही पर्वा न करता. तसेच कार्तिकी एकादशीसही आळंदी व पंढरपूर येथे...
पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. पण जेव्हापासून या पक्षात पितरांच्या श्राद्धाची परंपरा सुरू झाली तेव्हा पासून आजतायगत या परंपरेत फारसे बदल झाले नाही. ही परंपरा देखील प्राचीन काळापासून सुरूच आहे.
श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने...
अमरावती - : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्यानंतर जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आला होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे...
घडामोडी
2 मंत्र्यांसह विद्यमान कार्याध्यक्षांना दिला डच्चू देऊन काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल
अमित गुरव
नवी दिल्ली - : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल अखेर हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतंच. त्याप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.
नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे...
मुंबई - आज मुंबईत शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला. ...
एकात्मता स्तोत्रातील प्रातःस्मरणीयअमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ‘ठक्करबाप्पा’( २९ नोव्हेंबर १८६९—२० जानेवारी १९५१)
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म. पुण्याची अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते ‘एल्.सी.ई.’ झाले ( १८९०). पुढे त्यांनी वढवाण व पोरबंदर ह्या संस्थानांत (१८९१–९९), पूर्व आफ्रिकेतील युगांडा रेल्वेत ( १८९९–१९०२) व सांगली संस्थानात (१९०४–०५) अभियंता म्हणून कामे केली. ते मुंबई महानगरपालिकेत नोकरीस होते. ही नोकरी...
1540 साली महाराणा उदयसिंह व महाराणी जयवंताबाई यांच्या पोटी प्रतापसिंह यांचा जन्म झाला. मनुष्याकडे जर आत्मबल असेल तर कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे महाराणा प्रताप होय ! प्रतापसिंह जेव्हा सिहासनवर आले तेव्हा मोगलांचे संकट मोठे होते , राज्याची घडी नीट न्हवती , मेवाड चा मानबिंदू चित्तोडगड मोगलांकडे गेले होते . प्रतापसिह यांनी राज्याची घडी बसवली,...
एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले.
रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला..
ते प्रवासी 'ऑल द बेस्ट' च्या प्रयोगाला चालले होते..!आपल्या मुलाच्या...










