का कुणास ठाऊक पण आज घोर प्रश्नांनी मस्तकात वाजविलेला शंखनिनाद उपरांत विदीर्ण झालेले मन आणि त्यातून निर्माण होणारी व्याकुळता एका तुरुंगात डांबून ठेवलेल्या कैद्यासारखी भासत आहे.
अतंर मनात चालू असलेली ही किलबिल म्हणजे जणूकाही सर्वांनी चहूबाजूंनी अपेक्षांचा भंडारा आपल्याच कपाळी लावावा आणि जबाबदारीची पालखी खांद्यावर वाहून मिरवणूक काढण्यात यावी याचा प्रत्यय येतोय.
आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण काय केले पाहिजे...
पहाटेच्या प्रसन्न वेळी किंवा संध्याछाया पसरतांना दिसणारे धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. औदुंबर, पिंपळ आदी वृक्षांनी घेरलेल्या मार्गातूनच आपण मंदिराकडे जातो. पायर्या चढून जातांना दोन्ही बाजूंनी सावलीचा आधार असतो. गाभार्यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात.
धारेश्वर मंदिर हे साडेचार एकर परिसरात आहे. सध्याचे मंदिराचे स्वरूप हे १९७८ मध्ये निर्माण झालेले आहे. देवळाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार...
रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का….???पण सुरेश वाडकरांनी तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत.सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात.
ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.
ही माणसं अशा...
पैशाने मजबूत असलेले नामांकित सिनियर वकील ज्यूनियर वकिलांना पैसेच काय पण त्यांच्या वकिली क्लृप्त्या पण देणार नाहीत हे खरे आहे. कारण त्यांना वकिली व्यवसायात त्यांचे स्पर्धक तयार करायचे नाहीत, हे झाले एक कारण व ज्यूनियर वकील हे सिनियर वकिलांचे जवळचे नातेवाईक नाहीत हे झाले दुसरे कारण....
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजचं उदघाटन झालं. उदघाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. याशिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगलं यश मिळवून दिलं आहे. यामुळे अमित शहा हे नारायण राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी...
रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते.
रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. "म्युझिक ऑफ...
बांगडी हा अतिप्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा मनगटावर धारण करावयाचा एक अलंकार आहे. याला ‘चुडा'( सौभाग्य ) असे म्हणतात.
१ ) महाराष्ट्रात लग्नाच्या आधी वधूला भरावयाच्या बांगड्यांना ‘लग्नचुडा’ असे म्हणतात. तो मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो.
२ ) बंगालमध्ये प्रामुख्याने शंखांच्या बांगड्यांना सौभाग्यालंकार मानले आहे. तेथे विवाहप्रसंगी वधूला लाल व पांढऱ्या रंगांचा चुडा भरण्याची प्रथा आहे. विवाहानंतर वधू ज्यावेळी...
सौभाग्यालंकारांतील एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे पदांगुलीतील ‘जोडवी’ किंवा ‘बिछवा’ (टो रिंग). ती म्हणजे पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालावयाची चांदीची किंवा इतर धातूंची वळी असतात.
प्राचीन काळापासून सुवासिनी स्त्रिया याचा वापर करत असाव्यात. वाल्मीकिरामायणामध्येही ‘वलय’ या अर्थी जोडव्यांचा उल्लेख आढळतो. जुट्-जुड् या धातूपासून जोडवी हा शब्द बनला असून त्याचा अर्थ बंधन असा आहे. हा अलंकार विवाहोत्तर घालावयाचा असल्याने सौभाग्याचे किंवा पातिव्रत्याचे बंधन...
हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते.
वासंतिक नवरात्र - वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत वशारदीय नवरात्र - शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्रात `घटस्थापना' हा मुख्य विधी असतो.
घटस्थापना -नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या...
भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थक एकच. पण शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. हिंदू धर्मानुसार ३३ कोटी देवी-देवता मानल्या जातात. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. याविषयी अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की खरोखरच ३३ कोटी देवी देवता असतील का ?
वेद-पुरांणांमध्ये ३३ 'कोटि' देवी - देवता असल्याचे म्हटले आहे. येथे कोटी हा शब्द विशेषणात्मक...










