Home Blog Page 35
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) दैनिक जनमतचे विभागीय प्रतिनिधी आणि सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र पोर्टल व युट्युब चॅनलचे मुख्य संपादक, मनमिळाऊ स्वभाव आणि रोखठोक, निर्भीड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मा. श्री. संभाजी जाधव यांना कोल्हापूर जिल्हा परिषद मार्फत दिला जाणारा ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. संभाजी जाधव ( आजरा ) यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय आणि ग्रामीण घडामोडींवर आपल्या...
आजरा (हसन तकीलदार) -: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दि. १ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. तहसील कार्यालय, आजरा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत ही सोडत पार पडणार असल्याचे परिपत्रकाद्वारे प्रशासनाने कळवले आहे. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दि. १३/०६/२०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, तसेच...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा -कासारकांडगाव रस्ता व गटारीचे काम मागील वर्षी करण्यात आले. परंतु या ठिकाणच्या गटारीचे काम व्यवस्थित झाले नसल्याची तक्रार येथील राहिवाशी करीत आहेत. गटारीचे पाणी योग्य ठिकाणी निचरा होत नसल्यामुळे पटेल कॉलनीतील विधवा महिला रेश्मा पटेल यांच्या घरात घुसले आहे त्यामुळे त्यांच्या प्रापंजिक व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. घरात झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा उरलेली नाही....
मला आता त्या पुस्तकाचे नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण त्या पुस्तकात फार छान संदेश दिला आहे … त्याची एक समरी सांगतो. वाढदिवस हा अँक्युअली दुःखाचा क्षण आहे. आपल्या आयुष्यातील एक वर्ष निघून गेले, कमी झाले, आपला मृत्यू जवळ आला हा वाढदिवसाचा स्पष्ट - स्पष्ट अर्थ आहे.आणि या निघून गेलेल्या दुःखाचा क्षणाचे सेलेब्रेशन आपण चाकू या हत्याराने (काही ठिकाणी तर...
आजरा(हसन तकीलदार ):- येथील तालुक्याच्या ठिकाणी खेड्या-पाड्यातील, वाडी- वस्तीतील, बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलां- मुलींनी चांगले दर्जेदार शिक्षण घ्यावे या हेतूने 1932 साली स्थापन झालेल्या आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयवंतराव शिंपी यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलात शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढवत नेत आज इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक, हायस्कूल, ज्युनिअर व वरिष्ठ महाविद्यालय एकाच...
आजरा(हसन तकीलदार ) :-गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेच्या कु.स्वराज प्रवीण निंबाळकर व विवेक धनाजी पाटील (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्यामुळे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड होवून त्यांचे पाच दिवसांच्या अभ्यास सहली करीता बेंगलोर येथे प्रयाण झाले . या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा...
आजरा (हसन तकीलदार ):-अगोदरच आजऱ्याचे तीन खंड करून तीन तालुक्याला जोडले गेल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खिळ बसल्याचा आरोप होत असतानाच पुन्हा एकदा जिल्हापरिषद व पंचायत समितीचे गण कमी करून तालुक्यावर अन्याय केला असल्याचा सर्व पक्षीय नेत्यातून सुर उमटत आहे. पूर्वी जिल्हापरिषदेचे तीन व पंचायत समितीचे सहा अशी मतदार संघाची रचना होती. परंतु नगरपंचायतीचे कारण पुढे करीत जिल्हापरिषदेचे एक व पंचायत...
इचलकरंजी ( प्रतिनिधी ) इचलकरंजीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आता गावभाग पोलीस ठाण्याच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा थेट आरोप केला असून, या संदर्भात आठवडाभरात पोलीस ठाण्याकडून कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही. राज्य शासनाने डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता दिलेली असतानाही, काही पोलीस ठाण्यांमध्ये अजूनही डिजिटल...
आजरा (हसन तकीलदार ) :-महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून मराठी शाळा बंद करण्याच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या राज्यसरकारच्या धोरणाला विरोध असून पहिलीपासून हिंदीची सक्ती धोरण मागे घेण्यासाठी आजरा तालुका पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देत हिंदी सक्ती करू नये असे म्हटले आहे. ...
नवी दिल्ली/मुंबई – केंद्र आणि राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एक योजनेअंतर्गत आता लाखो बहिणींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जावर सरकारद्वारे व्याज सुद्धा सबसिडीच्या स्वरूपात दिले जाणार आहे. ✅ योजनेचे नाव – महिला उद्योजकता विकास योजना / महिला स्वयंरोजगार कर्ज योजना 🔍 योजनेचा उद्देश गृहिणी, ग्रामीण महिला,...