Home Blog Page 46
आजरा : (अमित गुरव) बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., एक्संबा (मल्टी स्टेट), शाखा- आजरा येथील बचत कर्जदार हिना फय्याज मुल्ला रा. आजरा यांचे आकस्मित निधन झाल्याने यांचे वारस रियाज आप्पा मदार (वडील ) यांना संस्थेकडून सदस्य कर्जदार मरणोत्तर निधीतून रु. ३०,०००/- इतके आर्थिक धनसहाय्य, शाखा चेअरमन श्री. ज्योतिप्रसाद सावंत याच्या हस्ते वितरीत करण्यात आले. निधी मंजूरीसाठी संस्थापक माजी खासदार...
अमित गुरव --: दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये प्रसूती साठी गेलेल्या सुशांत भिसे कुटुंबीयांना पैसे भरा असा तगादा लावून त्यांना चुकीची वागणूक दिली होती. या पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या झालेल्या निंदनीय प्रकाराचा निषेध करीत आहोत मृत्यू पावलेल्या ताई यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांच्या दोन्ही जुळ्या बाळांना उत्तम आरोग्य सुख...
अमित गुरव -: महाराष्ट्रातील पतसंस्थेमध्ये गुणात्मक दृष्ट्या प्रथम क्रमांकावर आणि सहकार क्षेत्रामध्ये गेली 42 वर्ष आदर्श काम करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षी एकूण ५३६ कोटी संमिश्र व्यवसाय केला असे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री गोरख चव्हाण यांनी नमूद केले. ...
१) गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या मतदारांचे मी आभार मानतो आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचे पण मी आभार मानतो. निवडणुकीत जे झालं ते झालं आता पुढे काय ते बघूया..२) गेल्या काही दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल मला बोललंच पाहिजे. पहिला विषय कुंभमेळा....
महाराष्ट्र आणि कर्नाटक, दोन्ही राज्यं आपापल्या भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखली जातात. मराठी आणि कन्नड या दोन समृद्ध भाषा आहेत, पण गेल्या काही दिवसांत या भाषांचा वापर लोकांना एकमेकांविरुद्ध भडकवण्यासाठी होतोय. आपला देश “विविधतेत एकता” या तत्त्वावर उभा आहे, पण आता काही लोक आपली मातृभाषा दुसऱ्यांवर लादून ही शांतता भंग करत आहेत. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये बेळगाव आणि मुंबईत...
आजरा - कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत क्रीडा विकास योजनेच्या माध्यमातून साळगाव (ता. आजरा) येथे उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळा इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी सैनिक विश्वास व्हळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच धनंजय उर्फ भैय्या पाटील म्हणाले, राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून व जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर...
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यामुळे बेहिशेबी रोख रक्कम सापडली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. न्यायाधीश वर्मा यांनी हे आपल्याला फसवण्याचे आणि बदनाम करण्याचे षड्‍यंत्र असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालादरम्यान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अंतर्गत चौकशीबाबत...
कोलकत्ता- 2025च्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यामध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या 175 धावांचे आव्हान आरसीबीच्या संघाने 16 व्या षटकामध्ये पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने धमाकेदार नाबाद 59 धावांची अर्धशतकी खेळी करत आरसीबीच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. केकेआरने दिलेल्या 175 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीच्या...
आजरा - ( अमित गुरव ) -: आजरा शहर अंतर्गत घरगुती पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमुना दर्जा पाहणी करणे व इतर चालू कामाबाबत चौकशी चे आदेश प्रांताधिकारी गारगोटी यांनी नगरपालिकेला दिले आहेत. आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा नळपाणी योजना बाबत तसेच आजरा रहिवासी लोकांच्या अन्यायाविरोधात अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होते. त्यातील एक...
हरपवडे ता.आजरा येथे तिथि नुसार शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.पहाटे ज्योत ही रामतीर्थ -शिवतीर्थ आजरा -साळगाव -पेरणोली -हरपवडे कडे पोचलो. कार्यक्रमाची सुरवात ही महीला लेझिम खूप छान पद्धतीने झाली. त्याबद्दल सर्व महीला लेझिम पथकाचे मनःपूर्वक आभार.त्यानंतर सरपंच श्री सागर पाटिल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.श्री बाळासो पाटिल यांच्या हस्ते देवीची आरती झाली.सर्वांना अल्पोहार देउन संध्याकाळच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. सायंकाळी ठीक ९.०० वा....