Homeवैशिष्ट्येGanpati Aarti:ह्या गणेशोत्सवी आपल्या गणरायाचे स्वागत मंगलमय आर्त्याने करा, बोला गणपती बाप्पा...

Ganpati Aarti:ह्या गणेशोत्सवी आपल्या गणरायाचे स्वागत मंगलमय आर्त्याने करा, बोला गणपती बाप्पा मोरया!|This Ganeshotsavi welcome your Ganaraya with auspicious artya, say Ganpati Bappa Morya!

गणपती आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥

Ganpati Aarti

शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥

Ganpati Aarti

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

(Ganpati Aarti)गजानना श्रीगणराया आधी वंदू तुज मोरया

गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥
मंगलमूर्ती श्री गणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०१॥

सिंदुर-चर्चित धवळे अंग ।
चंदन उटी खुलवी रंग ।
बघतां मानस होतें दंग ।
जीव जडला चरणी तुझिया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०२॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

Ganpati Aarti

गौरीतनया भालचंद्रा ।
देवा कृपेच्या तूं समुद्रा ।
वरदविनायक करुणागारा ।
अवघी विघ्नें नेसी विलया ।
आधी वंदू तुज मोरया ॥०३॥
गजानना श्रीगणराया ।
आधी वंदू तुज मोरया ॥

संदर्भ


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular