Homeघडामोडीभादवण मध्ये रेबीज पसरण्याचा धोका वेळीच ओळखा..

भादवण मध्ये रेबीज पसरण्याचा धोका वेळीच ओळखा..

अमित गुरव ( भादवण) – गेल्या काही दिवसात भादवण मध्ये भटक्या श्वान ( कुत्र्याचा) वावर बराच वाढला आहे. त्यात काल पासून एका श्र्वानाने ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही तरुण मुले त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करूनही या गल्ली तून त्या गल्लीत करण्यापलीकडे काही करू शकली नाहीत.


कदाचित असेच राहिले तर ते श्वान त्यांच्या मागे लागलेल्या मध्ये एकद्याला किंवा रस्ताने जाणाऱ्या कोणाला तरी चाऊ शकते. यावर उपाय म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे तसेच खबरदारी म्हणून सरकारी दवाखान्यात जर कोणी दाखल झालेच तर त्यासाठी लागणारा औषध पुरवठा तयार असावा नाहीतर एकद्या गरीबाला इंजेक्शन मिडिकल मधून विकत घेण्याची वेळ येऊ शकते ; अशी मागणी ग्रामस्थ करू लागलेत. आधीच पाऊस नसल्याने हैराण त्यामुळे कदाचित तो या काळात उपचार लांबवण्याची शक्यता त्यांचा जीवावर बेतू नये यासाठी हा अट्टाहास …

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular