Homeक्राईमगडहिंग्लज मध्ये परप्रांतीय तरुणांकडून अल्पवयीन मुलीची छेड

गडहिंग्लज मध्ये परप्रांतीय तरुणांकडून अल्पवयीन मुलीची छेड

गडहिंग्लज (प्रतिनिधी ) -: गडहिंग्लज येथे पीओपी चे काम करणारा ठेकेदार बरकतअली रईस पाशा ( उत्तरप्रदेश सद्या गडहिंग्लज ) या ठेकेदाराजवळ कामाला असलेल्या शेहजाद शेख ( वय २६) मुळगाव उत्तरप्रदेश याने एका अल्पवयीन मुलीची दोन दिवसापूर्वी छेड काढली होती. हा प्रकार आज गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज शहरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर संबधित ठेकेदारास जाब विचारला तेव्हा त्याने मी त्याला मारले असून तो सद्या पळून गेल्याचे सांगत उडवाउडवची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया देत जमावाने त्याच्या दुकानाची मोडतोड केली.

संतप्त जमाव पोलीस ठाण्यात आला त्यावेळी हिंदुत्ववादी लोकांनी घोषणाबाजी करत त्या दोघांवरही गुन्हा दाखल करून घ्या आणि आरोपींना अटक करा नाहीतर आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष आप्पा शिवणे यांनी घेतली. त्याचवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले , संतोष चिकोडे यांनी व जमावाने कारवाई साठी जोर धरला.

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादनुसार आठ दिवसापूर्वी शेख याने मुलीचा कपडे धूत असताना फोटो काढला. मुलीने फोटो डिलीट कर असे म्हणताच तिचा हात पकडुन विनयभंग केला. सदर प्रकार माहीत झाल्यावर मालक बरकत यांनी परस्पर प्रकरण मिटवून आरोपी शेख याला मदत केली त्यामुळे दोघांविरोधात पॉस्को आणि विनयभंग अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल केले.

यावेळी पोलीस ठाणे परिसरात मोठी गर्दी झाली होती . पोलिसांनी ती पांगवण्याचा प्रयत्न करूनही वारंवार तोच प्रकार दिसत होता. प्रत्येकजण गुन्हा नोंद झाला काय अशी विचारणा करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular