Homeमुक्त- व्यासपीठनवी पिढी | New Generation

नवी पिढी | New Generation

ती : इन्स्टंट रिप्लाय?

मी : अरे दिवसभर ऑनलाईनच असतो.

ती : आणि काम?

मी : कामच ऑनलाईन आहे.

ती : कुठलं सेक्टर?

मी : डिजिटल मार्केटिंग.

ती : म्हणजे माझा अनुभव तुला समजावणं, मला कठीण जाणार नाही.

मी : टॉपिक?

ती : सुरुवातीला माझा परिचय देते.

मी : ओके.

ती : मी बीडीएस सेकंड इअरला आहे.

मी : ओके.

ती : माझी आई स्त्रीरोग तज्ञ आणि पप्पा डेंटिस्ट आहेत.

मी : ओके.

ती : लहान बहीण बारावीला होती. ती एका विषयात फेल झाली.

मी : ओके.

ती : ६ महिन्यांपूर्वी मला आमच्या सोसायटीमधील एका मैत्रिणीचा कॉल आला होता.

मी : ओके.

ती : त्यानंतर हे प्रकरण मी गांभीर्याने घेतलं.

मी : काय सांगितलेलं मैत्रिणीने?

ती : तिने माझ्या लहान बहिणीकडे आयफोन पाहिलेला.

मी : मग?

ती : घरची परिस्थिती चांगली असूनही, मम्मी पप्पा आम्हाला सुरुवातीपासून अगदी गरजेपुरते पैसे देतात.

मी : मग तिच्याकडे कोणता मोबाईल होता?

ती : वनप्लस.

मी : ओके.

ती : माझ्या मैत्रिणीने बहिणीच्या हातात दोनदा आयफोन १३ पाहिलेला.

मी : ओह.

ती : ती गोष्ट माझ्या मैत्रिणीला खटकली.

मी : कोणती?

ती : १ लाख रुपये किमतीचा मोबाईल बहिणीच्या हातात असणं.

मी : पुढे?

ती : मी लगेच माझ्या बहिणीकडे त्याबद्दल चौकशी केली.

मी : मग?

ती : तर तिने सांगितलं की, तिच्या हातात मैत्रिणीचा फोन होता.

मी : ओके.

ती : मीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि विषय तिथेच संपवला.

मी : मग?

ती : त्यानंतर मी महिनाभरासाठी घरी सुट्टीला गेले होते.

मी : ओके.

ती : तेव्हा मलाही काही गोष्टी खटकल्या.

मी : कोणत्या?

ती : त्याकाळी बहिणीची ऑनलाईन शॉपिंग वाढली होती.

मी : ओके.

ती : ती महागडे ब्रँडेड टी-शर्ट, टॉप आणि जीन्स वापरायला लागली होती.

मी : ओके.

ती : मी मोठी असल्याने मला तिच्यापेक्षा जास्त पॉकेटमनी मिळायचा.

मी : साहजिकच.

ती : मात्र त्याकाळात ती माझ्या पाचपट खर्च करत होती.

मी : मग?

ती : मी तिचं बँक स्टेटमेंट चेक केलं.

मी : मग?

ती : तिच्या अकाउंटवर त्यावेळी १३०० रुपये होते.

मी : मग?

ती : मग तर माझा संशय पक्का झाला.

मी : कसला?

ती : काहीतरी गौडबंगाल आहे.

मी : ओह..

ती : अक्षय माझे आईवडील उच्चशिक्षित आहेत.

मी : बरोबर.

ती : इंटरनेट, मेल, व्हॉट्सॲप ते सतत वापरतात.

मी : करेक्ट.

ती : असं असूनही त्यांना या गोष्टी खटकल्या नव्हत्या.

मी : का बरं?

ती : कारण त्यांना इंटरनेटची फक्त चांगली बाजू ठाऊक आहे.

मी : हो. पण मित्रमंडळी?

ती : सर्कलदेखील त्यांच्याच वयोगटाचं असल्याने मर्यादित विषयांवर संवाद.

मी : त्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद गरजेचा.

ती : त्याहूनही महत्वाचं म्हणजे..

मी : काय?

ती : घरातील थोरल्या मुलांनी धाकट्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं.

मी : सहमत.

ती : मी माझ्या बहिणीच्या वागण्यावर बारीक लक्ष ठेऊन होते.

मी : मग?

ती : मला तिच्या वागण्याचा पॅटर्न बदललेला जाणवत होता.

मी : म्हणजे?

ती : स्मार्टफोन वापरायला लागल्यापासून, ती रोज रात्री १-२ वाजता झोपायची.

मी : मग?

ती : मात्र गेल्या वर्षभरापासून..

मी : काय?

ती : तिचं लास्ट सीन साधारण १० वाजताचं असायचं.

मी : लवकर झोपायची?

ती : त्याच प्रश्नाचं उत्तर मला सापडायचं होतं.

मी : मग?

ती : मी घरी असताना मला जाणवलं..

मी : काय?

ती : तिच्या रूमची लाईट रात्री ३-४ वाजेपर्यंत सुरु असते.

मी : अरे..

ती : हो ना. म्हणून माझ्या डोक्यातील विचारांचं चक्र थांबायचं नावच घेईन.

मी : काही क्ल्यू मिळाला?

ती : मिळत नव्हता. मात्र एकदिवस..

मी : काय झालं?

ती : बहिणीचं ऑनलाईन शॉपिंगचं पार्सल आलं, आणि नेमकी ती घरी नव्हती.

मी : मग?

ती : डिलिव्हरीसाठी आलेल्या मुलाने सांगितलं की, तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे.

मी : मग?

ती : मी नेमका तेव्हाच तिला कॉल केलेला.

मी : मग?

ती : तिने कॉल उचलला आणि मला पार्सल घ्यायला सांगितलं.

मी : मग?

ती : क्ल्यू मिळाला होता.

मी : कोणता?

ती : मोबाईल नंबर.

मी : कुणाचा?

ती : मी डिलिव्हरी बॉयकडून बहिणीचा रजिस्टर मोबाईल नंबर घेतला.

मी : वेगळा होता?

ती : हो. चोर पकडला गेला होता.

मी : मग?

ती : मी लगेच तो नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला.

मी : पुढे?

ती : मी त्या नंबरचं व्हॉट्सॲप चेक केलं, आणि मला घामच फुटला.

मी : का?

ती : त्या नंबरच्या डीपीला एका मुलीचा सेमी न्यूड फोटो होता.

मी : चेहरा दिसत होता?

ती : नाही खांद्यापासून खाली.

मी : पुढे?

ती : मी त्याच रात्री, त्या नंबरचं व्हॉट्सॲप चेक केलं तर..

मी : तर काय?

ती : दिवसभर ऑफलाईन असलेला तो नंबर, ११ नंतर ऑनलाईन होता.

मी : मग?

ती : पुढे काय करावं, मला काहीच सुचत नव्हतं.

मी : मग?

ती : माझा एक टेक्नो सॅव्ही मित्र आहे.

मी : ओके.

ती : मी त्याच्या कानावर हे प्रकरण घातलं.

मी : मग?

ती : त्याने एक प्लॅन बनवला.

मी : कोणता?

ती : त्या नंबरला ‘Hi’ पाठवण्याचा.

मी : ओके.

ती : त्याने एका रात्री त्या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवला आणि क्षणात रिप्लाय आला.

मी : काय?

ती : डेमो पाहायचा असेल, ५० रुपये गुगल पे करा.

मी : मग?

ती : मित्राने पैसे गुगल पे केले आणि त्याला रात्री १ वाजता एक व्हिडीओ कॉल आला.

मी : मग?

ती : तो कॉल मित्राने रिसिव्ह केला.

मी : मग?

ती : समोरची मुलगी फक्त ब्रा आणि पॅंटीवर होती.

मी : कोण मुलगी?

ती : तिने तोंडावर मास्क लावलेलं होतं.

मी : मग?

ती : मित्राने प्रसंगावधान दाखवून स्क्रिनशॉट घेतले आणि कॉल कट केला.

मी : पुढे?

ती : त्यानंतर मित्राने व्हॉट्सॲपवर मला ते स्क्रिनशॉट पाठवले.

मी : मग?

ती : मी एका क्षणात ती भिंत आणि बाजूचं कॅलेंडर ओळखलं.

मी : OMG

ती : प्रचंड राग आलेला, मात्र परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संयम राखला.

मी : बरं केलं.

ती : दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर, आमच्या मोलकरीण ताईला भाजी आणायला बाहेर पाठवलं आणि दरवाजा लॉक करून घेतला.

मी : मग?

ती : बहिणीला माझ्या रूममध्ये बोलावलं.

मी : मग?

ती : मला जे काही समजलं होतं, ते सगळं तिला सांगितलं. तरीही एक तास तिने गुन्हा मान्यच केला नाही.

मी : मग काय केलं?

ती : नाईलाजाने मी तिला माझ्याकडचे स्क्रिनशॉट दाखवले आणि ती विनवण्या करत रडायला लागली.

मी : मग?

ती : तिने स्वतः तिचा आयफोन मला आणून दिला आणि कबुली दिली.

मी : कसली?

ती : वर्षभरापासून ती कॅम सेक्स, व्हिडीओ चॅट सेक्स आणि स्ट्रिपिंग करून पैसे कमावते आहे. तिला ते व्यसनच जडलं होतं.

मी : काय?

ती : हो. एका न्यूड कॉलचे तिला ५०० रुपये भेटायचे.

मी : आणि क्लायन्ट भेटायचे कुठून?

ती : तिने त्यासाठी फेक इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं होतं. ती बॉलिवूड हिरो हिरॉइनच्या फोटाखाली कमेंट करून, स्वतःचा इन्स्टाग्राम आयडी द्यायची. त्यानंतर तिच्याशी संपर्क करणाऱ्याकडून आधी पैसे मागवून घ्यायची आणि मग व्हिडीओ कॉलवर कपडे काढायची.

मी : बाप रे..

ती : मम्मी पप्पांना यातलं काही कळू न द्यायच्या अटीवर, तिने मला सर्व गोष्टी सांगितल्या.

मी : बरं झालं, तू तुझ्या पद्धतीने सोक्षमोक्ष लावला.

ती : अक्षय तिच्या इतर ३ मैत्रिणीही हाच उद्योग करतात. त्यांनीच तिला पैसे कमवण्याचा हा सोपा मार्ग सुचवला होता.

मी : भयंकर आहे.

ती : अरे तिने या उद्योगासाठी वेगळं सिमकार्ड आणि मोबाईल विकत घेतलेला, शिवाय वेगळं बँक अकाउंटही सुरु केलेलं.

मी : आजची फास्ट फॉरवर्ड टेक्नो जनरेशन.

ती : तिने तोपर्यंत ६७ हजार रुपये कमावले होते.

मी : च्यामारी.

ती : तिला दहावीपर्यंत खूप चांगले मार्क पडायचे. मात्र अकरावीला नवे मित्रमैत्रिणी मिळाले आणि..

मी : म्हणून तर संगत महत्वाची.

ती : अक्षय पण तुला काय वाटतं?

मी : कशाबद्दल?

ती : मी जर या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं नसतं तर?

मी : एखाद्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं असतं.

ती : उद्या तिच्या हातून आणखी वाईट गोष्टी घडल्या असत्या?

मी : पुढची पायरी तीच होती.

ती : मला आताच्या टेक्नॉलॉजीचं बऱ्यापैकी ज्ञान असल्याने गोष्टी सोप्या झाल्या.

मी : करेक्ट.

ती : जर माझे आईवडील वेल क्वालिफाईड असूनही त्यांना या गोष्टी समजल्या नाहीत, तर मग इतरांचं काय?

मी : गंभीर विषय आहे.

ती : अक्षय बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे नवनवे आजार आपल्या आजूबाजूला वावरत आहेत.

मी : हो ना.

ती : त्यासाठी बदलणाऱ्या काळानुसार समाजप्रबोधन अत्यंत गरजेचं आहे.

मी : त्यासाठी तंत्रज्ञानाचा सदुपयोग गरजेचा.

ती : म्हणून तर आज तुझ्याशी बोलायचं ठरवलं.

मी : आजच या विषयावर लिहितो.

ती : तुझ्या माध्यमातून माझा हा अनुभव वाचून, किमान १० कुटुंबं जरी सावध झाले तरी खूप आहे.

मी : नक्की प्रयत्न करूयात.

ती : कारण एकदा वेळ हातातून निघून गेल्यावर, हातात फक्त पश्चाताप उरेल.

मी : ज्जे बात.

संकलन – लिंक मराठी…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular