Homeघडामोडीडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुका कार्यकारिणी जाहीर

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुका कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी निवडी उत्साहात

सरवडे, दि. 8 (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात 14 हजाराहून अधिक सभासद संख्या असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने शनिवारी राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या अध्यक्षतेखाली सरवडे (ता. राधानगरी) येथील शिवाजीराव खोराटे विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी एकमताने करण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी लवकरच एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याबरोबरच सावंतवाडीत होणारे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.


राधानगरी तालुकाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी कृष्णात लाड यांची निवड करण्यात आली. सचिवपदी बाजीराव मोरे, खजिनदारपदी संजय किरुळकर, संपर्कप्रमुख म्हणून आकाश पाटील तर राधानगरी तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी निलोप्रभा जाधव यांची निवड करण्यात आली. कागल तालुकाध्यक्षपदी ओंकार पोतदार यांची तर उपाध्यक्षपदी अक्षय घोडके यांची निवड जाहीर करण्यात आली. सचिवपदी अभिजीत वंडकर, सहसचिवपदी विवेक पोतदार यांची तर संपर्कप्रमुख म्हणून ज्योतीराम कुंभार यांची निवड झाली.
भुदरगड तालुकाध्यक्षपदी राजेंद्र दबडे तर भुदरगड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी रोहिणी साळुंखे-चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून टी. एम. सरदेसाई तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी महेश पाटील यांना संधी देण्यात आली.


सर्वही नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले यांच्या हस्ते निवडपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी सहसचिव इंद्रजीत मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे, रामनाथ डेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी बदलत्या युगात डिजिटल मीडियाचे महत्व, त्याचबरोबर या क्षेत्रात काम करताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष दीपक मांगले, पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सहसचिव इंद्रजीत मराठे यांनी केले तर आभार महेश पाटील यांनी मानले. बैठकीस तीनही तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular