कानोली ( ता. आजरा )येथे ग्रामपंचायत प्रशासनमार्फत आठवडा बाजाराचा शुभारंभ सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, गावातील वृद्ध व जेष्ठ नागरिक यांना भाजीपाला व किराणा खरेदीसाठी महागाव व अन्य ठिकाणी जावे लागत होते, त्यातच बस ची गैरसोय त्यामुळे याचा त्रास वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना होत होता, याची गरज ओळखून ग्रामपंचायत मार्फत दर शुक्रवारी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे,त्याचा शुभारंभ शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी करण्यात आला, यावेळी उपस्थित व्यापारी वर्गांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

पहिल्याच दिवशी ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला, भाजीपाला, किराणा व खाद्य पदार्थ यांचे स्टॉल लागले होते, खरेदीसाठी ग्रामस्थांनी गर्दी केली, यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीपतराव देसाई, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, गजानन दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील,ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, सौ. सारिका भोसले, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंडितराव पाटील, राजू पाटील, तानाजी पाटील, जयसिंग पाटील, बळवंत पाटील, राजू आपगे सूर्यकांत मुरुकटे, शामराव पाटील, चंद्रकांत पाटील रंजना आपगे , यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार सुभाष पाटील यांनी मानले..


मुख्यसंपादक