Homeघडामोडीडोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या 'त्या' निर्णयाला न्यायालयाने दिली स्थगिती !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाला न्यायालयाने दिली स्थगिती !

USA Birthright Citizenship : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच वादग्रस्त निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यापैकीच एक निर्णय देशात जन्मजात नागरिकत्व रद्द करणे. ट्रम्प यांनी सत्तेत येताच जन्माच्या आधार नागरिकत्व प्रदान करण्याची प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या आदेशाला अमेरिकेच्या फेडरल जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मजात नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश पूर्णपणे असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केले. सोबतच, या निर्णयाला 14 दिवसांचा तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे.ट्रम्प यांच्या नागरिकत्वाच्या निर्णयाविरोधात डेमोक्रॅटच्या नेतृत्वाखालील चार राज्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना अमेरिकेचे फेडरल जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी या आदेशाला स्थगिती दिली. तसेच, “माझ्या 40 वर्षांच्या न्यायालयीन कारकिर्दीत, मी कधीही संविधानाच्या पूर्णपणे विरोधात असलेला एवढा स्पष्ट खटला पाहिलेला नाही.”, असेही यावेळी बोलताना न्यायालयाने म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवीन आदेश काय ?

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होताच पहिल्याच दिवशी जन्माच्या आधारावरील नागरिकत्वाची तरतूद काढून टाकण्याच्या आदेशावर सही केली आहे. नवीन निर्णयानुसार, मुलांच्या पालकांपैकी एक जण अमेरिकन नागरिक, ग्रीन कार्डधारक किंवा अमेरिकन सैन्याचा सदस्य असेल तरच नागरिकत्व मिळेल. बेकायदेशीर स्थलांतरित आणि बर्थ टूरिझम रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

जन्मजात नागरिकत्व कायदा काय आहे ?

जन्मजात नागरिकत्वाच उल्लेख अमेरिकेच्या राज्यघटनेतच आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या 14व्या घटनादुरुस्तीने जन्माच्या आधारावर नागरिकत्वाचा अधिकार दिला आहे. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीचा जन्म जर अमेरिकेच्या भूमीवर झाला असेल, तर त्याला आपोआप त्या देशाचे नागरिकत्व मिळते. त्याच्या पालक कोणत्याही देशाचे नागरिक असले तरीही त्याने यावर काहीही परिणाम होत नाही. हा कायदा 1868 मध्ये लागू करण्यात आला होता. याचा मूळ उद्देश गुलामगिरीतून मुक्त झालेले नागरिक व त्यांच्या कुटुंबियांना समान अधिकार देणे हा होता.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular