जीवनाच्या रंगमंचावर
वाट्यास आलेली भूमिका,
प्रत्येकाला स्विकारावीच लागते.
नियतीच्या हातचे बाहुले बनून,
सुखदुःखाची उन – सावली
अंगावरती घ्यावीच लागते.
संकटं आणि आव्हानांशी,
दोन हात ते करताना,
प्राणपणाने लढावेच लागते.
ऋणानुबंध अन् नातीगोती,
जपताना ती, आयुष्यातील,
तडजोड ही करावीच लागते.
नाना प्रकारची पात्र रंगवीत,
अपुल्या जीवननाट्य मंचावरती,
दादही मिळवाविच लागते.
जीवननाट्याचा अवधी किती?
किंचितशी कल्पना नसतानाही,
बिनधास्तपणे वावरावेच लागते.
खडतर जीवन वाटेवरती,
शोध भाकरीचा घेताना,
कष्टही अपार करावेच लागते.
ध्येयासाठी प्रेरीत होवूनी,
आशावादी सदैव राहुनी,
जीवन अपुले, सजवावेच लागते.
श्री रेवाशंकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक