ज्या ज्या ठिकाणी तूझा
हक्क, अधीकार, योग्यता असुनही
डावलल्या जाशील
तूझ्या अंगी असलेल्या कला
गुणांना, प्रतिभेला केवळ ते तू– तू
आहेस म्हणून मूद्दामहुन
संधी नाकातील तेंव्हा तेंव्हा
अळी मिळी गुपचिळी बसून चालणार नाही…
तेंव्हा या विरुद्ध आवाज उठवावा
लागेल, झगडावं लागेल,
संधर्ष करावा लागेल.
कारण रडल्या शिवाय आईही
पोटच्या मुलाला पाजत नाही.
ही तर गेंड्याची कातडी पांघरलेली
निष्ठूर, निर्दयी अन्य केवळ तूझ्याच
स्वाभिमानावर घाव घालण्यासाठी
टपूण बसलेली लांडग्यानां धार्जीणी
व्यवस्था आहे.
अजून ही वेळ गेलेली नाही…
तूझ्यात रग आहे,धग आहे
तू तझ्या वैभवशाली, सामर्थ्यवान
इतिहासाकडे बघ एकदा…
तुला तुझा धेय्याकडे जाणारा
मार्ग ही दिशेल..
आता का तु दबलास,थांबलास, थकलास
तर तुझी लाकडी मसणात न्यायला
तुझ्या अस्तीत्वावरच घाला घालायला
गिधाडे टपलेलीच आहेत…
एकदा बघ अवती भवती अन्य
हो जागा
तु सिंहांचा छावा आहेस … या जंगलावर
अधीराज्य करण्यासाठीच जन्म तुझा …
फक्त तु मेंढरांच्या कळपात
राहुन तू तूला विसरलास
फोड डरकाळी आसमंत भेदणारी
या संघर्षाच्या वाटेवरून
चालताना पडशील, ठेचाळशील ,
रक्त बंभाळ होईल सर्वांग सारं ….
एकदा का तू मार्गस्थ झालास विजयाचा
उन्माद न येता तुला तुझी जाणीव
झाली की मग उद्याची
सकाळ,दुपार, तुझीच असेल
अन् आयुष्याची संध्याकाळ
समाधानी कृतार्थ ……
जगन्नाथ काकडे
मेसखेडकर
मुख्यसंपादक