Homeघडामोडीउद्यापासून बत्ती गुल होण्याची शक्यता

उद्यापासून बत्ती गुल होण्याची शक्यता

सर्व आप्त, मित्र आणि परिजनांना नम्र आवाहन,

● आज रात्री १२:०० वाजलेपासून म्हणजे ०४.०१.२०२३ च्या ००:०० पासून आम्ही निर्मिती, पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगारवर्ग 72 तासांच्या संपावर जात आहोत.

● मुंबई आणि पुणे शहर येथे अदानी इलेक्ट्रिक कंपनी ने समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला असून इतरही नफ्याची शहरे ताब्यात घ्यायचा सदर कंपन्यांचा प्रयत्न आहे.

● सद्यस्थितीत Cross Subsidy च्या समीकरणातून संपूर्ण महाराष्ट्रात एकच वीजदर लागू केला जातो, ज्यामुळे विजेचे दर नियंत्रणात राहतात.

● असे खाजगीकरण झाल्यास cross subsidy च्या समीकरणावर थेट परिणाम होऊन वीजदर नियंत्रणाबाहेर जातील.

● ह्या गोष्टीला विरोध म्हणूनच आम्ही प्रशासनाला दीड महिन्यापूर्वीच संपाची नोटीस दिली होती.

● पण प्रशासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.

● ह्या संपाचा परिणाम सर्वांवरच होऊ घालणार आहे, वीजपुरवठा आहे असा ठेऊन आम्ही संप सुरू करीत आहोत, पण वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कधी पूर्ववत होईल हे सांगता येणार नाही.

● आपणास सर्व गोष्टींची कल्पना असावी, आणि चुकीच्या बातम्या येऊन गैरसमज होऊ नयेत म्हणून ह्या आवाहनाचा प्रपंच.

● मोबाईल आणि तत्सम गोष्टी चार्ज करून ठेवावेत, सर्व शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करावी.

● होणाऱ्या तसदीसाठी दिलगीर आहोत, पण आज नाही तर कधीच नाही.

● आपल्या सर्वांच्या हक्कासाठी पुढील चांगल्या भवितव्यासाठी संपास पाठिंबा देणे बाबत व सहभागी होण्याबाबत आवाहन करत आहे.

  • आंदोलक वीज कर्मचारी.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular