Homeघडामोडीकदाचित तुम्हालाही हा msg आला असेल पण त्यामागील सत्य..

कदाचित तुम्हालाही हा msg आला असेल पण त्यामागील सत्य..

महाराष्ट्र ( अमित गुरव ) – : महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारी ती २८ हजार पोस्ट ची जाहिरात सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक अश्या पद्धतीने २८ हजार कृषी मित्र पदाच्या जागा भरणेबाबत ही जाहिरात आहे. वयाची अट २२- ३८ वर्षे असून बारावी उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना ही मेगा भरती ची संधी , वेतन ८५०० दाखवले आहे. संबंधित जाहिरात महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय कृषी विकास मिशन अंतर्गत महामंडळाव्दारे विपणीत उच्च व गुणवत्तायुक्त कृषी उत्पादनांना योग्य मूल्यावर उपलब्ध करण्यासाठी राज्यातून पात्र व्यक्तींच्या कडून ६ ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे फॉर्म भरण्यासाठी कोणतेही शुल्क नसल्याने लोक आपल्या संबंधिताना आणि सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि प्रचार करत आहेत. पण ही www.reewinindia.com वरील जाहिरात शासकीय नसून प्रायव्हेट कंपनी ची आहे . त्या वेबसाईटवर अधिकच्या माहिती करता भेट दिली असता ही खासगी कंपनी असून २९ जून २०२१ रोजी स्थापन करण्यात आली तर ही वेबसाईट ७ जुलै २०२१ ला बनली असे समजते . पण लोकांना ती शासकीय आहे की प्रायव्हेट असा संभ्रम निर्माण झाला होता ? माहितीच्या कमी अभावी आपल्या जवळच्या अधिकाऱ्यांना आणि पदसिद्ध अधिकाऱ्यांना लोकांनी कॉल आणि msg करून लोकांनी गोंधळून टाकले होते. अश्या इतर वेबसाईटवर जाण्याआधी आणि आपली वयक्तिक माहिती इतरांना देण्याआधी लोकांनी सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. या पद्धतीच्या वेबसाईट च्या माध्यमातून अनेक वेळेस फसवणूक होत असल्याची पण अनेक उदाहरणे देता येतील. याबाबत महाराष्ट्र शासन किंवा जिल्हापरिषद या मधून अद्याप कोणतेही परिपत्रक आले नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

लिंक मराठी ला या जाहिरातीचा संशय का आला ?

ग्रामपंचात मध्ये शिपायांना ५१०० च्या आसपास वेतन असते आणि शासकीय कृषी मित्राला साधारण ५००-६०० रुपये मानधन मिळते मग या जागेसाठी इतके वेतन कसे ? आणि पेपर ऍड न देता प्रत्येक वेळी ही एकच सॉफ्ट कॉपी सर्वाना का मिळते या सर्व प्रकारामुळे जाहिरातीत नमूद फोन नंबर ला कॉल केला असता तो बंद लागला. या कारणास्तव आणि लोकहितासाठी आम्ही बातमीच्या मुळापर्यंत जाण्याचे ठरवलं.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मला ही असा whatsapp msg आला आहे मी ती लिंक ओपेन करून फॉर्म भरला ,पण ते document वेरीफिकेशन साठी २८५ रु भरायला सांगतात . मी नहि भरणार

- Advertisment -spot_img

Most Popular