Homeबिझनेसकर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ?

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते ?

तसे तुम्हाला माहिती असेल – कर्जाचे दोन प्रकार असतात यामध्ये पहिला प्रकार म्हणजे गृहकर्ज आणि दुसरा प्रकार म्हणजे वैयक्तिक कर्ज

📒 तसेच मृत्यूनंतर कर्जाची परतफेड करण्याबाबत प्रत्येक कर्जासाठी वेगवेगळे नियम आहेत – हे नियम गृहकर्जामध्ये वेगळे आहेत – तर वैयक्तिक कर्जासाठी वेगळे आहेत – असे बँकेने सांगितले

आणखी काय सांगितले बँकेने ?

  • बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे – गृहकर्जामध्ये कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी सह-अर्जदार किंवा हमीदार जबाबदार असतो – तसेच जर हे दोघेही नसतील –

– तर बँक जो कर्जदाराच्या मालमत्तेचा वारस असेल त्याच्याशी संपर्क साधेल – तसेच या सर्व मार्गांद्वारे जर बँकेला कर्जाची रक्क्म भेटली नाही – तर बँक त्या मालमत्तेचा लिलाव करेल आणि आपली थकबाकी वसुल करेल

  • वैयक्तिक कर्जामध्ये – दोन प्रकारचे कर्ज आहे यामध्ये सुरक्षित आणि असुरक्षित – सुरक्षित कर्जामध्ये FD, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी आणि सुवर्ण कर्ज असते
  • तसेच असुरक्षित कर्जामध्ये कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक प्रथम कर्ज हमीदारशी संपर्क करेल – तसेच जामीनदार नसेल तर बँक वारस आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क करेल – आणि कर्जाची रक्कम वसूल करेल –
  • त्याचबरोबर वाहन कर्जामध्ये जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक घरमालकांना कर्ज भरण्यास सांगते – जर त्याने कर्जाची परतफेड केली नाही – तर बँक वाहन विकून कर्जाची रक्कम वसूल करेल – असे बँकेने सांगितले .

बँकेने दिलेली हि माहिती – आपल्यासाठी ,नक्कीच खूप महत्वाची आहे .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular