HomeUncategorizedकळत पण वळत नाही

कळत पण वळत नाही

आज सकाळीच वॉक साठी गेले असताना त्या काकी भेटल्या ज्या आपल्या उदर निर्वाहासाठी आपला सर्वांचा परिसर स्वच्छ ठेवतात. ती त्यांची नोकरीच , हातावरच पोट असे ही म्हणण्यास वावगं ठरणार नाही . मिळेल ती कामे करून आपला संसार सांभाळणे , आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे ही त्यांचं कर्तव्यच.

मला पाह्ताच त्या म्हणाल्या ” म्याडम खूप दिवसांनी दिसलात ” ?

मी म्हणाले ” पावसामुळे येणं होत नाही बाकी काही नाही काकी , तुमची झाली का साफसफाई ची काम ” ?

थोड्या शांततेने म्हणाल्या ” कुठे वो म्याडम रोज रोज तरी किती तेच तेच , ते पहा ना कचरा कुंडीत कचरा कमी डब्याच्या बाहेरच जास्त आहे. त्या पहा भिंती रंग मारलेला कुठे दिसत च नाही फक्त दिसत आहेत त्या गुटखा आणि तंबाखू खाऊन केलेली लाल तांबडी रंगपंचमी , किती साफ तरी करायचं , बरं ? बोटाला ही काल साफ करताना दुखापत झाली माझ्यासोबत च शेवंती बाई येते तिची वाट पाहत होते बोटाला जरा हे ब्यांडेज लावलं असतं . “

“दया मी लावते” काकी मी बोलले.

” तुम्ही S S लावून द्याल ” ? इतक्या उत्कटतेने म्हणाल्या.

” का ? मी नाही लावू शकत का ? “

” तसे नाही म्याडम इथे बरेच लोक आम्हा शी कोणी बोलायला ही नाही पाहत कारण आम्ही कचरा उचलतो , साफसफाई करतो “

” द्या इकडे , मी लावते, देवाने आपल्याला सर्वाना एकमेकांसारखेच बनवले आहेत , आपली काम कितीही वेगळी असो, ज्यांना बोलायचं नसेल ते नाही बोलतील पण आपण ही काही खास आहोत हे नका विसरू , तुम्ही परिसर स्वच्छ ठेवायचं काम करता हे ही काही छोट काम नाही ”

ते ऐकून त्यांना बर वाटलं , त्यांना ब्यांडेज लावून मी आपल्या कामासाठी निघाले.

मनात खूप वाईट वाटत होत. त्यांच्या भावना ऐकून… आणि हे खरच आहे का म्हणून आपण थोडी तसदी नाही घेऊ शकत कचरा कचरा कुंडीत नीट टाकण्याचा , का आपण आपल्या भारताच्या भिंतीवर थुकत राहतो , प्ल्याटफॉर्म असो कि मैदान , रस्ते , कोणतीही जागा असो , ही दृश्य आता रोज चीच आहेत.

पण कधी बदलणार हे सर्व कि वर्षानुवर्षे हेच घडत राहणार. हे साफ सफाई कामगार आपल्या रोजीरोटी साठी हे काम करतात , झाडांचा पाला पाचोळा झाडे नाही उचलू शकत तो निसर्ग आहे पाने फुले टाकत जरी असला तरी उन्हाळ्यात सावली बनतात तर हिवाळ्यात पावसाळ्यात हिरवळ बनून आपल्या त नवीन ऊर्जा निर्माण करतात. आणि आपण त्या व्यक्ती आहोत ज्या बऱ्याच जन्मानंतर आपल्याला मानव जन्म मिळतो , जगातला सर्वात सुंदर गोष्टी आपल्याला जगता येतात , जे हवं ते करू शकतो , कष्ट करू शकतो , आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो , मग तुम्हीच विचार करा थुकण्याने आपली इमेज वृद्धिगत होत असावी का ? हर घर तिरंगा यावर्षी साजरा झाला. बरोबर ना आपला देश आपला आहे तो आपल्याला च स्वच्छ ठेवायचा आहे हे नका विसरू.

बाहेरचे देश विकसित असेच नाही झाले, त्यांनी ज्या गोष्टी बदलण्यास ठरवल्या ते साध्य ही केलं. आपण का नाही ठरवू शकत. का आपली विचार सरणी विकसित कडे वळत नाहीय. व्यसन करणं कॅन्सर ला आमंत्रण देत हे माहित असून सुद्धा आपण मनावर घेत नाही स्वतः च आयुष्य तर धोक्यात आणताच शिवाय आपल्या आजू बाजूचा परिसर हि अस्वछ ठेवण्यास कारणीभूत ठरता आपल्या येणाऱ्या पिढी आरामात शिकतील नाही का ? यासाठी त्यांना वेगळी अशी माहिती घेण्याची गरज नाही.

खूप सफाई कामगारांना मी पाहिलं आहे स्पंज घेऊन ते रंगीबेरंगी गुटखा मावा च्या छटा धुताना ,साफ करताना . वाईट वाटत पाहून खरंच .

आपल्या सारख्याच आहे त्या व्यक्ती का म्हणून त्यांनी ही काम करावी. तुम्हाला घाण करण्यास काही वाटत नसेल पण त्याना साफ करण्यास काही तरी वाटत असावं. प्ल्याटफॉर्म साफ करताना ही लोक साफ केलेल्या जागेत घुसून च जाण्याची घाई करतात थोडीशी तसदी घेण्याची गरज असते बाजूने जाण्याची पण आपण तसे करत नाही. समोरचा माणूस ही आपली काम करत आहे हे का न समजावं आपल्याला .

मी बोलेन व्यसन तर वाईट आहेत च ते आयुष्य कधीच चांगलं घडवू शकत नाहीत. पण आपण जी काम करतो ती काम ही आपल्या नजरेतून योग्य आहेत का याचा ही विचार करावा. लोक बदलो न बदलो स्वतः बदलला त तरी खूप आहे. त्या बदलण्याने तुम्हाला जे समाधान मिळेल ते मोलाचं असेल आणि हा … सफाई कामगार दिसले किंव्हा कोणतेही स्तरावर चे कामगार असो कधी कधी याना ही एक स्मित हास्य देत जा त्यांना बर वाटत .

आपण काही त्यांचा संसार करण्यास नाही जाणार आहोत माणुसकीने , प्रेमाने दोन शब्द बोलल्यावर त्यांना ही छान वाटत.

आपल्याला रोज सकाळी सुंदर उगवता सूर्य पाहण्याची इच्छा असते सुंदर बगीचा पाहण्याची इच्छा असते फुल पाहण्याची इच्छा असते पण या व्यक्ती तुमची सकाळ होण्या आधिच साफसफाई स करण्यास सुरु झालेले असतात . त्यांना ही आवडत नसावं का आपल्या सारखे सुंदर पहाट पाहण्याची आवडत ना.

त्यांना आता रोजचीच सवय झाली आहे . आज इतका कचरा साफ करायचा आहे तर इतकी काम करायची आहेत , पण तुम्ही ही विचार करा , कधीतरी त्यांना काम करण्यास सोईस्कर होईल असं तुम्ही ही करून पहा , नक्कीच त्यांना आनंद होईल.

शिवाय भारत माझा देश आहे नाही का हे आपल्या सर्वाना च माहित आहे यासाठी देश स्वछ ही ठेवायला हवा ना . बाहेरच्या देशातील प्रवासी फॉरेनर आल्यावर नावं ठेवून न जाता, स्वछता पाहून आनंदाने कौतुक करत जावे असे वाटत असेल तर कृपया आपली जमीन आपला देश स्वछ ठेवा. चांगल्या सवयी चांगलंच घडवणार आहे . हे सर्व कळत पण वळत नाही. आयुष्यातील वाईट कृतींची गाडी वळवा आणखीन सुंदर दिवस पाहण्यास मिळतील.

बदल आयुष्यात असायला हवा .

धन्यवाद

रुपाली शिंदे ( आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular