Homeवैशिष्ट्येखरा सत्यशोधक क्रांतीसुर्य

खरा सत्यशोधक क्रांतीसुर्य

आज ११ एप्रिल सत्यशोधक समाजाचे संस्थापक तसेच ज्यांनी शिक्षणाचा अनमोल वसा आम्हाला दिला.आपल्या पुरोगामी विचारांचे निर्भयपणे आचरण करणारे समाजसुधारक,एकंदरच सुधारणेसंबंधी क्रांतीकारक भूमिका घेणारे आधुनिक महाराष्टाचे विचारवंत म्हणजे महात्मा जोतीराव गोविंदराव फुले.महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी 11 एप्रिल १८२७ साली झाला त्यांचे मुळ आडनाव गोरे होते.वडिलांचा व्यावसाय फुलं विक्रीचा असल्याने त्यांना फुले म्हणून ओळखण्यात येवू लागले.व तेच नाव कायम रूढ झाले.
ज्योतिबा एक वर्षाचे असतानाच त्यांची आई देवाघरी गेली.गोविंदरावांना आपल्या मुलाला शिक्षण मिळावे असे वाटत होते.त्यावेळेस त्यांनी ज्योतिबाला सातव्या वर्षी खाजगी शाळेत घातले.त्यावेळी शिक्षणासाठी पुरक वातावरण नव्हते.गोविंदरावांना इतरांनी बुद्धीभ्रम केला.परिणामी ज्योतिबांनी शाळेतून काढण्यात आले.वयाच्या १३ व्या वर्षी नंतर त्यांचा विवाह धनकवाडीच्या झगडे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई हिच्याशी झाला.ज्योतिबांची चिंतनशिलता व बौद्धिक कौशल्य पाहून त्सांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्शक गफार बेग मुन्शी आणि धर्मोपदेशक लिजीट सीहेब यांना त्यांचे शिक्षण पुन्हा चालू करावे असा आग्रह गोविंदरावांकडे धरला.त्यांना त्यांनी मुलाच्या कर्तूत्वाला वाव मिळविण्यासाठी शिक्ण आवश्यक आहे.हे पटवून दिले.गोविंदरावांनी हे विचार पटले.त्यांनी पुन्हा ज्योतिबास शाळेत घालण्याचा निर्णय घेतला.इ.स.१८४१ मध्ये त्यांनी शिवाजी व वाॅशिंग्टन यांची चरित्रे‌ अभ्यासली.’राईट्स ऑफ मॅन’या थॉमस पेन यांच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता.
स्वातंत्र्य व लोककल्याण यांचा विचार करीत असताना ज्योतिरावांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली.ज्येातिराव आपल्या ब्राम्हण मित्राच्या‌ लग्नात गेले असता वरातीमध्ये ब्राम्हणांनी त्यांचा शुद्र म्हणून अपमान केला व त्यांना वरातीमागून येण्याचे सांगितले.तेव्हापासून त्यांच्या मनात चिड‌ निर्माण झाली.सामाजिक विषमतेविरूद्ध संघर्षकेला पाहिजे असा निर्धार त्यांनी केला.सामाजिक अप्रतिष़्ठेचा कलंक त्यांच्या पुढील आयुष्याचे उगमस्थान ठरला.पुढे या वैयक्तिक विमानाचं रूपांतर विशाल ध्येय्य शक्तीत‌ झालं.
अज्ञानरूपी अंधकाराला दूर करण्यासाठी शिक्षणासारखे प्रभावी साधन कुठलेच नाही ,सत्याने मानसाला सत्य आणि असत्याचा व अंतिम हिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होते.शिक्षण हे सुधारणेचे मुळ आहे.त्यातून स्वाभिमानाची जाणीव जागृत होते हे ज्योति रावांनी ताडले होते.त्यात स्त्रियांना शिक्षण म्हणजे पुढे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण असे ज्योतिरावांचे मत होते.पेशवाई जाऊन इंग्रजांची जुलमी राजवट आली होती.तरीही लोकांवर पेशवाईचा प्रभाव होता.पुण्यात स्त्रियांना शिक्षणाची अजिबात सोय नव्हती अश्या प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी १८४८मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली.ही शाळा बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात भरत असे.त्या काळात शिक्षक मिळणे कठीण असल्यामुळे ज्योतिबांनी सावित्रींना शिक्षण देऊन शिक्षिका म्हणून नेमले.ही गोष्ट त्याकाळी सनातन्यांना पटली नाही.म्हणून त्यांनी सावित्रीबाईंचा नाना प्रकारे छळ करण्यास सुरूवात केली.परंतू त्या आपल्या कामात मग्न होत्या.सनातनी लोकांना त्या म्हणत‌मी आपले कर्तव्य करीन,देव तुम्हांस क्षमा करो. एवढच नाही तर त्या कप्मठांनी त्यांच्या अंगावर शेण,चिखल टाकले तरीही तो फुलांचा वर्षाव समजुन आपले कार्य करत राहिल्या.गोविंदरावांनी सनातन्यांचादबाव असल्याने त्यांनी ज्योतिबांनी घराबाहेर काढले.तसेच दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे काही दिवस शाळा बंद ठेवावी लागली‌.आर्थिक परिस्थिती सुधारताच त्यांनीुनागंज पेठेत शाळा सुरू केली.मेजर कॅडी या शाळेला पुस्तके पुरवित.३ जुलै १८५१ लाही शाळा चिपळुनकरांच्या वाड्यात नेण्यात आली.त्यात मुलींची संख्या ४८ होती.पुढे १७ ऑक्टोबर १८५१ मध्ये रास्ता पेठेत त्यांनी मुलींची तिसरी शाळा काढली.तर चौथी शाळा १५ मार्च १८५२ रोजी वेताळ पेठेत काढली.ज्योतिबांच्या शाळांच्या बाबतीत ‘पुणा ऑब्झर्व्ह’ या वृत्तपत्राने असे मत व्यक्त केले की ,ज्योतिबांच्या शाळेतील मुलींची पटसंख्या सरकारी शाळेतील पटसंख्येपेक्षाही दहा पटीने मोठी आहे.’ज्ञानप्रकाश’या वृत्तपत्राच्या अंकात असे अव्यक्त केले की,सर्व जातीच्या मुलींसाठी ज्योतिराव फुले फार मेहनत करून विद्यादानाचे कार्य करत आहेत .या स्तुत्य कामाच्या सनामानार्थ‌ सरकारने शाल जोडी देण्याचा हुकूम केला.आणि सरकारणे इ.स.१८५२ मध्ये विश्राम बागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला.त्याकाळी स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती.ती फक्त एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडं पाहिलं जायचं.चुल आणि मुल एवढच तिचं कार्यक्षेत्र मानलं जाई.बालविवाह,स्त्रीभ्रूणहत्या,केशवपन यांसारख्या अनिष्ठ रचालीरूढींनी त्रस्त झालेल्या स्त्रीला न्याय देण्यासा़ठी स्त्री उद्धाराचे कार्य त्यांनी हाती घेतले.सन १८६४ मध्ये ज्योतिबांनी पुण्यातील गोखले बागेत शणवी जातीत एक पुनर्विवाह घडवून आणला‌.विधवा पुनर्विवाहास प्रारंभ केला.स्त्रीभ्रूणहत्या थांबावी म्हणून १८६४ मध्ये राहत्या घरी स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधक – बालहत्या प्रतिबंधक गृह आणि अनाथ आश्रम सुरू केले.जे भारतातील पहिलेच होते.याच आश्रमात काशीबाई नावाच्या ब्राम्हण विध्वेसमुलगा झाला त्याचे‌ नाव यशवंत ठेवून पुढे ज्योतिरावांनी त्याला‌दत्तक घेतले.त्यांनी केशवपन तसेच बहुपत्नीत्वाला विरोध केला.त्याकाळी अस्पृश्यांवर अनन्वित अत्याचार व्हायचे.सकाळ संध्षाकाळ त्यांना गावात फिरायची परवानगी नसे.त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला खराटा बांधला जात असे.अस्पृश्यांबद्दल घृणा ,रोष होता उच्चवर्णियांमध्ये.ज्योतिबांनी मे १८५२ मध्ये वेताळपेठेत शाळा सुरू केली.१८५३ मध्ये मित्रांच्या मदत३ने त्यांन३ महार,मांग या जातींना विद्या देण्यासाठी ‘मंडळी’या नावाची संस्था स्थापन केली.१८६८ मध्ये त्यांनी आपल्या घरीजवळचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.अस्पृश्यता निर्मूलनाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला.वडिलांच्या श्राद्धाचे जेवन भाऊ बंधांना न घालण्याऐवजी आंधळ्या पांगळ्यांना घातले.धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याकरिता ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.”सर्व साक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्ती”असे या समाजाचे ब्रिद होते.सत्यशोधक समाज ही समाजसुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होय.


सत्यशोधक समाजाची प्रमुख तत्त्वे:


१-सप्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहेत.आईवडिलांना प्रसन्न करण्यासाठी ज्या प्रमाने मध्यस्थाची गरज नसते त्याप्रमाणे ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी पुरोहिताची आवश्कता नसते.
२-प्रत्येकाला ईश्वर भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे.व्यक्तिचो श्रेष्ठत्व जन्मावर अवलंबून नसून गुणावर अवलंबून असते.
३-कोणताहीछंद कमी प्रतिचा नाही.ईश्वर निर्विकार आहे.
या समाजाचे प्रतिनिधित्व होताना पुढील प्रमाणे प्रतिज्ञा घ्यावी लागेल.सर्व मानव एकाच देवाची लेकरे आहेत.सर्व माझी भावंडे आहेत.अशा बुद्धिने मी त्यांच्याशी वागेन.धार्मिक विधीच्यावेळी मी मध्यस्त ठेवणार नाही .माझ्या मुलांना मी सुशिक्षित करीन.या समाजाचा‌विरोध ब्राम्हणाला नव्हता तर ब्राम्हण्याला होता.
महाराष्ट्रातील शेतकरी अनिष्ठ चालिरीती,धर्मभोळेपणा यांखाली दबला होता.दारिद्र्य ,मीगासलेपणा,कर्जबाजारीपणा यात शेतकरी पिचून गेला होता.त्यांना शेतकर्यांच्या स्थितिंचे ‘शेतकर्याचा आसुड’या ग्रंथात प्रभाविपणे वर्णन केले आहे.सर्व दु:ख दारिद्र्याचे मुळ त्यांच्या अज्ञानात आहे हे स्पष्ट करताना ज्षोतिबा म्हणतात –
“विद्येविना मती गेलीl मतिविना निति गेलीlनितिविना गती गेलीlगतीविना वित्त गेलेl
वित्ताविना शुद्र खचलेl
एवढे अनर्थ एका अविद्येने केलेl
१८८६ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टेारिया राणीचे चिरंजीव ड्युक ऑफ कॅनाट भारतात‌आल्यानंतर ज्योतिरावांनी शेतकर्यांची कैफियत शेतकर्यांच्या वेशात जाऊन सांगितली.मुंबईतील गिरणी कामगारांवर होणार्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी त्यांनी नारायणराव लोखंडे यांच्या साहाय्याने कामगार संघटना स्थापन केली.त्यांच्या कार्याचा मुंबई येथे गौरव करून त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी बहाल करण्यात आली.ज्योतिबांनी गुलामगिरी हा ग्रंथ १८७३ साली प्रकाशित केला.धार्मिक,सामाजिक अथवा इतर कोणत्याही गुलामगिरीविरूद़्ध त्यांच्या मनात तिटकारा होता‌.अमेरिकेतील गुलामगिरीबद्दल लढणार्या लोकांना त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला.’सार्वजनिक सत्यधर्म’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता.
असा हा क्रांतीसुर्य दिनांक २७ नोव्हेंबर १८९० रोजी अस्तास गेला.त्या महान मानवास शत् शत् नमन.

  • – सौ.भाग्यश्री आपेगांवकर
    ता-अंबेजोगा़ई
    जि – बीड
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular