Homeमुक्त- व्यासपीठगुन्हेगारी मानसिकता

गुन्हेगारी मानसिकता

मूलभूत वासनांसोबत चांगल्या व वाईट अशा भावना (वृत्ती) निसर्गानेच मनुष्याला दिल्या आहेत. या भावना (वृत्ती) मनुष्याच्या स्वतःच्या नाहीत तर त्या निसर्गाकडूनच मनुष्याला प्राप्त झाल्या आहेत. मूलभूत वासनांचे समाधान हे चांगल्या भावनांच्या संगतीत करायचे की वाईट भावनांच्या संगतीत करायचे हे निवड स्वातंत्र्य निसर्गाने मानवी बुद्धीला दिले आहे. या बुद्धीला लहानपणापासून जशी संगत लाभेल तसा माणूस घडत जातो. चांगल्या संगतीत सद्गुणी होतो तर वाईट संगतीत दुर्गुणी होतो. दुर्गुणी माणूस पुढे सराईत गुन्हेगार होतो. रागाच्या भरात एखादा सद्गुणी मनुष्यही अपघाताने गंभीर गुन्हा करू शकतो. पण असा चुकून झालेला गुन्हेगार व सराईत गुन्हेगार यात फरक असतो. एलएल. बी. चा अभ्यासक्रम पूर्ण करताना गुन्हेगारी मानसिकता (क्रिमिनल सायकॉलॉजी) या विषयाचा थोडाफार अभ्यास करावा लागतो. पुढे एलएल.एम. ला हा विषय स्पेशल घेता येतो. हा विषय इतका गहन आहे की यात पीएच.डी. ही करता येईल. हा विषय म्हणजे निसर्गाचे एक वास्तव आहे.

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular