गोकुळाष्टमीचा दिन श्रीकृष्ण जंन्माचा,
कारागृहात कंसाच्या जंन्म घनश्यामाचा.१
वसुदेव देवकीचा हा क्षण पूर्वपुंण्याईचा,
यमुनेच्या जळाशी स्पर्श बाळकृष्णाचा. २
महापूर आनंदाचा गोकुळात आला
कृष्णवेड्या गोपिकांचा रास रंगला.३
नादमय मुरलीने राधिकाही भारावली
पुनवेचा चांदण्याने धरतीही सुखावली.४
सकळ हरपले देहभान कन्हैयाच्या मुरलीने,
हंबरूनी येती धेनू देवा मुरलीच्या आवाजाने.५
जंन्मोजंंन्मीचे हे फळ मिळे पूर्वपुंण्याईने
लीला रचीता गोपाळ नाचती आनंदाने .६
इंद्रदेव बरसता देवा गोवर्धन पर्वता उचलीले ,
कालीयासी मर्दूनी यमुनेसी विषमुक्त केले .७
करीता बाललीला सवंगडी ते सुखावले ,
वधूनिया मामा कंस संतसज्जना रक्षीयले, ८
शिशूपालासी वधूनी यमपुरीसी धाडीले.
गीता सांगुनिया पार्था धर्मरक्षण देवा केले.९
कौरवांसी हरवूनी विजयी पांडवांसी केले ,
युगायुगात देवा अवतार घेऊनिया प्रगटले.१०
योगेश्वर भगवान तुम्ही भक्तरक्षणासी धावले,
श्रीकृष्ण जंन्मदिनासी मस्तक चरणावरी ठेवीले.११
जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या पावन दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी
माझे काव्यरूपी तुळशीपत्र समर्पित
रेवाशंकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक
[…] घनश्याम श्रीकृष्ण अमित गुरव […]